Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : साखरपुडा कार्यक्रमातून 12 लाखांचे सोने लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील चोपडा- शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा येथील सौभाग्य लॉन्समध्ये सोमवारी (ता. १९) साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना चोरट्यांनी महिलेच्या बॅगमध्ये असलेले ११ लाख ७१ हजार रुपये किमतीचे २६ तोळे सोने लंपास केले. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकुलखेडा (ता. चोपडा) येथील सौभाग्य लॉन्समध्ये सोमवारी (ता. १९) दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. या वेळी देवेंद्र नारायण चौधरी यांची २६ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. (Engagement program 12 lakh gold theft by thieves jalgaon crime news)

या सोन्याची किंमत बारा लाख रुपये आहे. बॅगमध्ये दोन लाख रुपये किमतीचे सात तोळ्याचे लहान नेकलेस, चार लाख ५० हजार रुपये किमतीचा मोठा सोन्याच्या नेकलेस, नऊ तोळे सोन्याचा मोठा नेकलेस, चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा नऊ तोळे वजनाच्या सहा बांगड्या, ५० हजार रुपये किमतीचे कानातले, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, १४ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या साखळ्या, ७ हजार रुपये किमतीचे १०० ग्रॅम वजनाचा कंबरेचा छल्ला असे एकूण ११ लाख ७१ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले आहे.

गुन्हा घडल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी हृषिकेश रावळे, पोलिस निरीक्षक चोपडा शहर के. के. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत. सदर गुन्हा शोधण्यासाठी पोलिसांनी फोटोग्राफर व इतर संशियतांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चोऱ्यांचे सत्र सुरुच

दरम्यान, काही दिवसांपूर्वी यावल रोडवरील समर्थ ट्रेडर्स त्यानंतर मेन रोडवरील वैभव ज्वेलर्स दुकानाचे शटर चोरट्यांनी तोडून चोरी केली होती. या चोऱ्यांचा अजूनही तपास लागलेला नाही. स्थानिक पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिलेला नसल्याने शहरात छोट्या, मोठ्या चोऱ्या होण्याचे प्रकार सुरुच आहेत. वाढत्या चोऱ्यांबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनीच दखल घ्यावी, अशी शहरवासीयांमधून मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT