mahesh Chaudhary esakal
जळगाव

Jalgaon Accident News : पारोळ्यातील माजी नगरसेवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : येथील माजी नगरसेवक महेश उत्तमराव चौधरी (वय ४७) यांना शुक्रवारी (ता. २०) सकाळी अज्ञात वाहनाने मागून दिलेल्या धडकेमुळे त्यांचा मृत्यू झाला. सकाळी महेश चौधरी आपल्या खासगी कामासाठी एरंडोल प्रांत कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. (Ex Corporator of Parola dies in road accident jalgaon news)

सार्वे गावाजवळील जिओ पेट्रोलपंपाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास पारोळ्याकडून एरंडोलकडे जात असताना पाठीमागून वाहनाने त्यांच्या बुलेटला (क्रमांक एमएच १९, सीएच १३११) जोरदार धडक दिली.

या धडकेत महेश चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील लोकांनी एरंडोल रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत पारोळा पोलिसात अंकित महेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तपास सहाय्यक फौजदार इक्बाल शेख करीत आहेत.

महेश चौधरी हे तेली समाजाचे माजी अध्यक्ष होते. या घटनेमुळे पारोळा शहरात शोककळा पसरली होती. रात्री नऊला अमळनेर रोडजवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे उद्यापासून २४ तास दर्शन, ६ किमीपर्यंत दर्शनरांग; आषाढीसाठी खास व्यवस्था

Petrol-Diesel Price: 15 जुलैचे नवे दर जाहीर! कच्चे तेल 15 डॉलरने महागल्यानंतर मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल आता कितीला?

आजचे पंचांग १५ जुलै २०२६! चंद्रदर्शन, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

Latest Marathi News Update : पनवेल-जेएनपीटी मार्गावर उड्डाणपुलाचा गर्डर कारवर कोसळला

Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT