Gold Silver Price Sakal
जळगाव

Pitru Paksha: सोने, चांदीच्या दरांत घसरण! पितृपक्ष असताही सोन्याला मागणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : इस्रायल व हमास यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय सोनेबाजारावर होण्याची शक्यता आहे.

युद्ध अधिक काळ चालले, तरी सोन्याच्या दर वाढण्याची शक्यता सराफ व्यावसायीकांनी वर्तविली आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात पंधराशे, तर चांदीच्या दरात तीन हजारांची घसरण झाली आहे. (Fall in gold silver prices Demand for gold despite patriarchy jalgaon)

गणेश चतुर्थीला (ता. २० सप्टेंबर) सोने ५९ हजार ५०० प्रती तोळा, तर चांदी ७३ हजार प्रती किलो (विना जीएसटी) होते. २९ सप्टेंबरला पितृपक्ष सुरू होताच, काही प्रमाणात सोन्याला मागणी घटली होती.

मात्र सोन्याचे दर कमी आहेत, ही संधी साधत अनेकांनी सोने खरेदी सुरू केली. सध्या सोन्याचा दर ५८ हजार, तर चांदी ७० हजारांवर आहे. ‘हमास व इस्रायल’ यांच्यातील युद्ध वाढल्यास त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक घडामोडींवर होतो. यामुळे सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

पाच आक्टोबरला सोने ५७ हजार ३००, चांदी ६९ हजार होती. चांदीत एक हजारांची घट होवून ती ६८ हजारांवर आली होती. आता सोन्यात सातशे रूपयांची वाढ होवून सोने ५८ हजारांवर, तर चांदीत दोन हजारांची वाढ होवून ते सत्तर हजारांवर पोचली आहे.

"पितृपक्षातही सोन्याची खरेदी ग्राहक चांगली खरेदी करीत आहेत. दर काही प्रमाणात कमी आहे. कमी दर झालेल्या संधीचे सोने ग्राहक करीत आहेत. इस्रायल व हमास यांच्यातील युद्ध आणखी काही दिवस चालल्यास सोन्याचे दर वाढतील, अशी शक्यता आहे."

-सुशिल बाफना, संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

काही दिवसातील सोने/चांदीचे दर असे

तारीख सोने (तोळा) चांदी (किलो)

२० सप्टेंबर ५९ हजार ५०० ७३ हजार

२९ सप्टेंबर ५७ हजार ८०० ७२ हजार

२ आक्टोबर ५७ हजार ८०० ७० हजार

५ आक्टोबर ५७ हजार ३०० ६९ हजार

६ आक्टोबर ५७ हजार ३०० ६८ हजार

७ आक्टोबर ५८ हजार ७० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT