Family goes to wedding Thief sakal
जळगाव

कुटुंबीय गेले लग्नाला अन्‌ चोरट्यांची बंगल्यावर ‘वरात’

संपूर्ण घराची उलथापालथ करून दागिने, रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुलाच्या लग्नासाठी औरंगाबादला गेलेले असताना बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ४४ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल तक्रारीनुसार, शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळील भिकमचंद जैननगरातील रहिवासी सुनील डिगंबर कपोते कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. त्यांची एमआयडीसी परिसरात (एन-१२७) येथे कँपोज इंडस्ट्रीज या नावाची प्लॅस्टिकची कंपनी आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न असल्याने कपोते कुटुंबीय शुक्रवारी (ता. ४) दुपारी १ वाजता दोघ घरांना कुलूप लावून औरंगाबाद येथे लग्नासाठी रवाना झाले होते.

लग्नसोहळा आटोपून कपोते कुटुंबीय वरातीसह रविवारी (ता. ६) घरी परतले. कपोते कुटुंबाचे नवदाम्पत्य घरी येणार म्हणून घरी लवकर येऊन नातेवाईक संजय सोनार, शुभम पवार, सचिन भावसार यांनी बंगला उघडण्यासाठी शिरले असता, त्यांना बंगल्याच्या मुख्य दाराचा कडीकोयंडा तोडून कुलूप फेकलेले आढळून आले. आत शिरल्यावर परिस्थिती आणखी वेगळी होती

संपूर्ण घराची उलथापालथ

बंगल्याचे कुलूप तोडलेल्या स्थितीत आढळल्यावर शहर पोलिसांना माहिती देत पोलिसांदेखत घरात जाऊन पाहणी केली असता, कपाटातील कपडे, पर्स व धान्य साठवण्याच्या कोठ्या उघडून धान्याची फेकमफाक झाल्याचे आढळली. घरातील शयन कक्षांसह स्वयंपाक घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले.

घराची रेकी करून शिरकाव

चोरट्यांनी बंद घराची रेकी करून नियोजनबद्धरीत्या घरात शिरकाव केला. मात्र, लग्नासाठी जवळपास सर्व दागिने आणि रोकड कपोते कुटुंबीयांनी सोबत नेले होते. चोरट्यांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून पर्समध्ये ठेवलेले २५ हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे टॉप्स, १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी व ४ हजार रुपये रोख असा एकूण ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी सुनील कपोते यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमेश बांदलकर करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT