Material thrown away by thieves esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कुटूंब गेले लग्नाला अन् घरात चोरट्यांच वऱ्हाड; हनुमाननगरातील बंद घर फोडले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील हनुमाननगरातील पाटील कुटुंब नातेवाइकांच्या लग्नासाठी गेले होते. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड लंपास केली. (family went to wedding closed house in Hanumannagar burglary Jalgaon Crime News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

हनुमाननगरातील विशाल गोपाल पाटील यांच्या घरात शेजारील योगेश महाजन यांनी डोकावून पाहिले असता, त्यांना शनिवारी (ता. ४) घराचे दार उघडे दिसले. त्यांनी विशाल पाटील यांना भ्रमणध्वनीवरून कळविले.

पाटील कुटुंबीय सायंकाळी घरी परतल्यावर त्यांना घराच्या मुख्य दाराचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. घरात गेल्यावर बेडरूममधील कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. कपाटाच्या लॉकरमधील २० ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या दोन बाह्या, दोन मंगळसूत्राच्या वाट्या आणि नऊ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

तत्काळ विशाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT