Farmer commits suicide esakal
जळगाव

जळगाव : सतत नापिकीच्या विवंचनेने शेतकऱ्याची आत्महत्या

पाथरी (ता. जळगाव) येथील ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पाथरी (ता. जळगाव) येथील ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सखाराम बुधा धनगर (वय ६५, रा. पाथरी, ता. जि. जळगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय सखाराम धनगर पत्नी, मुलगा व सून अशा कुटुंबीयांसह पाथरी येथे वास्तव्याला होते. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. शेतातील सततची नापिकी आणि आजारपणामुळे ते विवंचनेत होते. सोमवारी (ता. १) मुलगा, सून व पत्नी हे सर्व शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी सखारा धनगर हे घरात एकटेच होते. दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरातील कुटुंब दुपारी घरी आले तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी बेबाबाई, मुलगा गोविंदा, सून ज्योती, नातवंडे आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT