Farmer commits suicide due to lack of price for cotton jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

जामनेर : कापसाला (Cotton) भाव नसल्याने देवळसगाव येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने घेतलेले बँकांचे कर्ज वेळेत फेडता येत नसल्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आपल्या शेतातच आपली जीवनयात्रा संपविली. (Farmer commits suicide due to lack of price for cotton jalgaon news)

गोपाळ नारायण राजपूत (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना मंगळवारी (ता. १४) घडली. गोपाळ राजपूत यांच्या नावावर अडीच-तीन एकर शेतजमीन आहे.

त्यामध्ये सध्या कपाशी लागवड केली असून, आधीच्या वेचणी झालेल्या कपाशीला बाजारात पुरेशा प्रमाणात भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अस्मानी संकट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरील तीन ते चार लाखांपेक्षा अधिकच्या कर्जाची वेळेच्या आत परतफेड करता आली नाही, परिणामी शेतकरी गोपाळ राजपूत यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि आपली जीवनयात्रा संपविली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

मृत गोपाळ यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT