death esakal
जळगाव

Jalgaon News : धानवडच्या शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : धानवड (ता. जळगवा) येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (farmer committed suicide by hanging himself from lemon tree in field jalgaon news)

भरत युवराज पाटील (४०, रा. धानवड, ता. जि. जळगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

धानवड येथील भरत पाटील हे परिवारासह शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी (ता.१) ते शेतात गेले होते. शेतातील निंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शेजारील शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी गावातील ग्रामस्थांना माहिती दिली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी धाव घेत मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. रूग्णालयात लहान भाऊ आणि बहिणीने एकच आक्रोश केला होता.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृत भरत यांच्यामागे आई देवकाबाई, पत्नी ललिता, लहान भाऊ राजेंद्र, विवाहित बहिण, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT