धुळे-नंदुरबार जिल्हा बँके sakal
जळगाव

‘शेतकरी विकास’चा | धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेवर झेंडा

पटेल, कदमबांडे, पाटील यांचे वर्चस्व कायम

सकाळ वृत्तसेवा

धुळे : धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील दिग्गज राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने चुरस व उत्सुकता निर्माण झाली होती. या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. २२) जाहीर झाला. यात माजी मंत्री तथा आमदार अमरिश पटेल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वातील ‘सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल’ने पुन्हा एकदा बाजी मारली.

दुसरीकडे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालील ‘किसान संघर्ष पॅनेल’ला एका बिनविरोधसह चार जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, या निवडणुकीत खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील, तसेच जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे यांचे पुत्र अक्षय सोनवणे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

निवडणूक प्रक्रियेत १७ पैकी सात जागा या पूर्वीच बिनविरोध झाल्याने उर्वरित दहा जागांच्या निकालाची उत्सुकता होती. सोमवारी येथील वाडीभोकर रोडवरील पारस मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. सकाळी अकरापर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निरज चौधरी यांनी काम पाहिले.

सर्वपक्षीयचे विजयी उमेदवार असे
राजवर्धन रघुजीराव कदमबांडे (१३१ मते), हर्षवर्धन दहिते (५२), महंत दर्यावगीर दौलतगीर (६९४), शिलाबाई विजय पाटील (७५८), सीमा तुषार रंधे (७४५), राजेंद्र श्‍यामराव देसले (६२), अमरसिंग हुरजी गावित (१३), दीपक पुरुषोत्तम पाटील (बिनविरोध), भरत बबनराव माळी (बिनविरोध), शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक (बिनविरोध), प्रभाकर तुकाराम चव्हाण (बिनविरोध), श्‍यामकांत रघुनाथ सनेर (बिनविरोध), भगवान विनायक पाटील (बिनविरोध).

किसान संघर्षचे विजयी उमेदवार
चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी (५९), प्रा. शरद माधवराव पाटील (१२०), संदीप मोहन वळवी (१०), आमशा फुलजी पाडवी (बिनविरोध).

सुरेश पाटील, अक्षय पाटील यांचा पराभव
या निवडणुकीत इतर शेती संस्था मतदारसंघातून प्रा. शरद पाटील (१२०) यांनी माजी मंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील (७७) यांचा पराभव केला. तर प्राथमिक कृषी पतसंस्था, विका सेवा सहकारी संस्था साक्री तालुका या मतदारसंघातून हर्षवर्धन दहिते (५२) यांनी अक्षय पोपटराव सोनवणे (२५) यांचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Cut : ‘एलपीजी’च्या किमती कमी झाल्या! , आजपासून गॅस सिलिंडरचे दर बदलले

Dev Uthani Ekadashi 2025: देवउठणी एकादशीला 'या' वस्तू दान केल्यास भगवान विष्णूची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील

Latest Marathi News Live Update : मराठी भाषकांवर अन्याय, बेळगाव सीमाभागात आज काळा दिन पाळला जाणार

रोहित आर्याने १७ मुलांना जमवलं कसं? गोळी झाडली की नाही? एन्काउंटरबाबत मोठे अपडेट समोर

Satara Doctor Case : 'पोलिसांनी वास्तव मांडलं तर सर्वांना स्वीकारावं लागेल, मृतांचा अनादर ही आपली संस्कृती नाही'; मंत्री गोरे यांचं विधान

SCROLL FOR NEXT