जळगाव

केंद्र सरकारकडून दिलासा; आठवडाभरात मका खरेदी पुन्हा सुरू होणार 

सचिन जोशी

जळगाव : केंद्र सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी थांबविण्यात आली होती. मात्र, असंख्य शेतकऱ्यांचा मका अद्याप शिल्लक असल्याने खासदार रक्षा खडसे यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने राज्यातील सर्व शासकीय मका खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश १८ डिसेंबरला काढण्यात आले होते. मात्र, मक्याची जवळपास महिनाभराने उशिरा सुरू केलेली खरेदी, लॉकडाउनमुळे आलेल्या अडचणी, पोर्टल-सर्व्हर डाउनने खरेदी केंद्रांकडून मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मका शिल्लक आहे, अशा अडचणी खासदार रक्षा खडसेंनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. राज्य सरकारकडून त्यासंबंधी प्रस्ताव केंद्राकडे प्राप्त नसल्याचेही त्या वेळी समोर आले. 

आठवडाभरात पुन्हा खरेदी 
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी होण्याबाबत शासकीय मका खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळणेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून तत्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणेबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी विनंती खडसेंनी अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना केली होती. त्यानुसार राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला असता, केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळून मका खरेदी पुढच्या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे. 
 

राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचा मका खरेदीशिवाय पडून होता. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून राज्य सरकारला मुदतवाढीबाबत प्रस्ताव देण्याची विनंती केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होऊन आता केंद्र सरकार पुन्हा मका खरेदी सुरू करत असून, याद्वारे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
-रक्षा खडसे, खासदार (रावेर)  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT