Agriculture news  esakal
जळगाव

खरीपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू; शेत पेरणीयोग्य करण्यावर भर

खरीप हंगामाला अवघे दहा दिवस उरले असताना, शेतकऱ्यांची पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खरीप हंगामाला अवघे दहा दिवस उरले असताना, शेतकऱ्यांची पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात ३० टक्के वाढ होणार असून, कापूस उत्पादनही वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. कपाशीचा पेरा उशिरा होईल, तोपर्यंत पेरणीयोग्य शेत करण्यावर भर आहे. यंदा लवकर पाऊस असल्याने पहिल्या पावसानंतर पेरण्या उरकण्याचे नियेाजन शेतकऱ्यांनी केले आहे.

गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी यंदा राज्य शासनाने कपाशीचे (बीटी) बियाणे १ जूननंतरच विक्रीला परवानगी दिली आहे. यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. त्यांच्याकडे विहिरीत पाणी असूनही त्यांना बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. खरीप हंगाम मे-जूनपासून सुरू होतो. यामुळे कोरडवाहूसह बागायतदार शेतकऱ्यांनी शेतीमशागतीच्या कामांना सुरवात केली आहे. शेतातील धस मातीपासून वेगळे करणे, काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करणे, पेरण्यासाठी सऱ्या आखणे आदी मशागतीच्या कामांना सर्वच ठिकाणी वेग आला आहे. उन्हाळ्यामुळे मजूरटंचाई निर्माण झाली आहे. उन्ह्यात कामे करणे शक्य होत नसल्याने मजुरांनी इतर कामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाच्या सहाय्यानेच शेतीकामे करण्यावर भर देत आहे. असे असले, तरी काडीकचरा जमा करणे, तो जाळणे, अशा कामांना मजूर लागतातच. चांगला रोजगार देऊनही मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.

येत्या १ जूनपासून कपाशीचे बियाणे उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची त्यादिवशी बियाणे खरेदी केंद्रावर मोठी गर्दी उसळणार आहे.

मागील खरीप हंगामात कपाशीला नऊ ते १३ हजारांपर्यंत भाव मिळाला. कापसाअभावी अनेक जिनिंग, प्रेसिंग मिल्स वेळे अगोदरच चार महिने बंद झाली. यामुळे यंदाच्या हंगामात मागील तोट्याची कसर भरून काढण्यासाठी कपाशीला नऊ हजारांच्या पुढे भाव देण्याचे जिनिंग चालकांनी ठरविले आहे. यामुळे कपाशी पेरणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे.

''बियाणे विक्रेत्यांकडे आले आहे. मात्र, बियाण्यांची विक्री १ जूननंतरच करावयाची आहे, अन्यथा बियाणे विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांनी बोंडअळीचा धोका टाळण्यासाठी जून महिन्यातच पेरणी करावी.'' - संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT