bollworm on cotton crop esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : बोन्डअळी दणकली, एकरी 2 क्विंटलचा उतारा!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : चोपडा तालुक्यात यावर्षी कपाशीच्या पिकात बोन्डअळी कमालीची वाढल्याने कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले असून एकरी अवघा दोन क्विंटल कापूस येत असल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे.

खानदेशात अशीच परिस्थिती असून चोपडा तालुक्यात खरीप पूर्व कपाशी उपटने सुरू झाले असून पावसाच्या पाण्यावर लावलेल्या कपाशीच्या पिकाची एक वेचणी झाली आहे.(farmers worried due to bollworm on cotton crop jalgaon agriculture news )

तालुक्यात सुमारे 60 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे पीक असले तरी कवडी माल येत असल्याने वेचणी खर्चही वाढला आहे.यावर्षी निंदणी अधिक,वेचणी अधिक आणि भाव निम्म्यावर अशी स्थिती असल्याने कपाशीच्या पिकापासून येणाऱ्या उत्पादनाच्या आशा मावळल्या आहेत.

काही शेतकऱ्यांना बागायतीत एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन आले असले तरी कोरडवाहुत मात्र ते एक ते दोन क्विंटल इतकेच आहे.सध्या तालुक्यात कापूस 7000 ते 7200 रुपये प्रति क्विंटल ने खरेदी होत असून भाव स्थिर आहेत.

गेल्या दोन वर्षात उत्पादन अधिक येऊन भाव 7500 ते 14000 राहिले असले तरी यावर्षी ती तेजी नाही. बोन्डअळी मुळे पेस्टिसाईड ची विक्री वाढली मात्र उत्पादन वाढले नाही.

त्यामुळे गहू,हरभरा, मक्याचा रब्बी हंगामही लेट होणार आहे....गणपूर(ता चोपडा)कपाशीच्या पिकात लावलेल्या फेरोमेन ट्रॅप मध्ये अडकलेले पतंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT