bike accident esakal
जळगाव

भरधाव बुलेट कारवर धडकली; दारूच्या नशेतील दोघे तरुण जखमी

रईस शेख

जळगाव : मद्याच्या नशेत (Drunken) सुसाट बुलेट (Bullet Bike) हाकत असताना समोर आलेल्या कारवर आदळल्याने दोघे तरुण जखमी (Injured) झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) खेडीजवळ घडली. रविवारी (ता. २६) सकाळी याबाबत एमआयडीसी पोलीसात दुचाकीस्वारांवर गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (fast bullet hit the car 2 young men injured in drunkenness Jalgaon Accident News)

शहरातील जुना खेडी रोड परिसरातील ज्ञानचेतना सोसायटीत रवींद्र प्रल्हादराव टाले वास्तव्यास आहे. शनिवारी (ता. २५) रात्री ११.१० वाजेच्या सुमारास ते एमआयडीसीतील कार्यालयातून दैनंदिन काम आटोपून त्यांच्या (एमएच २० डीव्ही २६२३) क्रमांकाच्या कारने घरी जाण्यास निघाले होत. राष्ट्रीय महामार्गावरून भुसावळच्या दिशेने जात असताना खेडी गावाजवळ उजव्या बाजूने कारचे इंडिकेटर देवून वळत असताना सुसाट वेगाने समोरून आलेल्या (एमएच १९ डीके ००४१) बुलेटस्वारांनी त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात बुलेटचे चाक कारमध्ये अडकून दोघे बुलेटस्वार खाली फेकले गेले.

यातील बुलेट चालविणाऱ्या तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातग्रस्त दुचाकीस्वारांना सावरण्यासाठी कारचालक टाले खाली उतरून त्यांच्या दिशेने गेले असता, अपघातात जखमी दोघांनी यथेच्छ मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना तत्काळ उचलून दवाखान्याच्या दिशेने धाव घेतली. रविवारी दुपारी रवींद्र टाले यांच्या तक्रारीवरून दोघा बुलेटस्वारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

NMMC Election: गणेश नाईक पार्टीविरोधात शिवसेनेची लढाई, जाहीरनामा प्रकाशनावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?

Pimpri News : भारतीय तरुणाला कंबोडियात बनवले ‘सायबर स्लेव्ह’; तब्बल चार महिने खोलीत डांबले

Education News : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एमएचटी-सीईटी, एमबीए-सीईटीला नोंदणी आजपासून सुरू; 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT