Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बाप-लेकास बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : धानवड येथे शेतकऱ्याच्या तुरीच्या पिकाचे नुकसान गावातील तरुणांनी केले होते. या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी केल्याने तिघांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

धानवड (ता. जळगाव) येथे शेतकरी संदीप लक्ष्मण पाटील कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गावातीलच रवींद्र पाटील, गजानन पाटील, नामदेव पाटील यांनी संदीप पाटील यांच्या शेतातील तुरीच्या पिकाचे नुकसान केले होते. (Father And Son Brutal beating by ThreeJalgaon Crime News)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

गुरुवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातला संदीप पाटील यांनी तिघांना पिकाची नुकसानभरपाई द्या, असे सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी शिवीगाळ करून लोखंडी पाइपने संदीप पाटील यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

संदीप याचे भांडण सोडविण्यासाठी वडील आले असता, त्यांनाही दोघांनी डोक्यात दगड मारून दुखापत केली. जखमी पिता-पुत्राच्या तक्रारीवरून रवींद्र पाटील, गजानन पाटील व नामदेव पाटील यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक मुदस्सर काझी तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT