Father and son sentenced Life imprisonment in Raju Kautik Mal murder case Malpur dhule sakal
जळगाव

मालपूरच्या राजू कौतिक माल खून प्रकरणी पिता-पुत्रांना जन्मठेप!

धुळे : न्या. चव्हाण यांचा निकाल : राजू मालचे खून प्रकरणी पोरक्या कुटुंबाला भरपाईचा ऐतिहासिक निर्णय

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील राजू कौतिक मालचे खून प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपी पांडू मालचे व त्याच्या दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला. तो न भरल्यास तीन महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षाही न्या. चव्हाण यांनी सुनावली.

मालपूर येथील आशाबाईचा पती राजू मालचे २५ ऑगस्ट २०१९ ला सायंकाळी सातला घरी पोचला. भूक लागल्याने त्याने पत्नीकडे जेवण मागितले. तिने थोडा वेळ थांबा, असे सांगितले. या कारणावरून पती-पत्नीत भांडण सुरु झाले. तेव्हा सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेजारी वास्तव्यास असलेले पांडू हिरामण मालचे, त्यांचा मुलगा सुभाष पांडू मालचे, ज्ञानेश्‍वर पांडू मालचे भांडणाच्या घटनास्थळी आले. त्यांनी काहीही कारण नसताना राजू यास बुक्क्यांनी मारहाण केली. हस्तक्षेप व विनवण्या करत पत्नी आशाबाईने तिघांपासून पतीची सुटका कली. जबर मारहाणीमुळे राजू यास मालपूर येथील डॉ. गणेश पाटील यांच्याकडे नेण्यात आले. नंतर त्यास पुढे उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचारावेळी २९ ऑगस्ट २०१९ ला राजू मालचेचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी पीडित आशाबाईने संशयित पांडू मालचे, त्यांचा मुलगा सुभाष व ज्ञानेश्‍वर मालचेविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला.

दोंडाईचा पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक डी. ए. पाटील यांनी तपास सुरू केला. साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविल्यानंतर संशयितांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. या खटल्याचे कामकाज न्या. चव्हाण यांच्यापुढे चालले. जिल्हा सरकारी वकील ॲड. देवेंद्रसिंह तवर यांनी सरकार पक्षाकडून फिर्यादी आशाबाई मालचे, पंच केशव वाघ, छगन भिल, डॉ. गणेश पाटील, डॉ. लक्ष्मीकांत साठे, डॉ. रमेश गढरी, प्रत्यक्ष साक्षीदार भिका भिल, डॉ. कीर्ती रुईकर व तपासी अंमलदार पाटील यांची साक्ष नोंदविली. या अनुषंगाने उच्च न्यायालयातील आदेशांचा आधार घेत संशयित पितापुत्रांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. तवर यांनी केला. तो ग्राह्य मानत न्या. चव्हाण यांनी तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ॲड. तवर यांना हवालदार बी. व्ही. गवळे, ॲड. मयूर बैसाणे यांचे सहकार्य लाभले.

न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय का

न्या. चव्हाण यांच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी सांगितले, की खून खटला चालविताना मृत राजू मालचे याच्यावर त्याची पत्नी, चार मुली व दोन मुलगे, असे एकूण सहा अल्पवयीन अपत्ये आणि अंध आई अवलंबून असल्याचे युक्तिवादातून निदर्शनास आणले होते. घरातील कर्ता गेल्याने असे एकूण आठ जण उघड्यावर आल्याने ते पोरके, अनाथ झाले. याबाबत गांभीर्याने विचार केला जावा, असा आग्रही युक्तिवाद केला. त्याची दखल घेत न्या. चव्हाण यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला शिफारस केली की पीडित वारसांना योग्य ती नुकसान भरपाई अदा करावी. यापूर्वी जिल्ह्यात कधीही फौजदारी प्रक्रिया कलम ३५७-अ- २ अन्वये पीडित वारसांना वेगळी नुकसान भरपाई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिली नव्हती. मात्र, राजू मालचे खून प्रकरणी न्या. चव्हाण यांनी पोरक्या पीडित कुटुंबाला नुकसान भरपाईची शिफारस केल्याने हा ऐतिहासिक निर्णय ठरला असून त्यामुळे अनाथ मुले, पीडित पत्नी, अंध आईच्या उदरनिर्वाहासाठी तरतूद निर्माण होणार असल्याचे ॲड. तवर यांनी सांगितले.c

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT