Cough esakal
जळगाव

Jalgaon News : दीर्घकाळ राहणाऱ्या खोकल्याचे रुग्ण अचानक वाढले; अशी घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात सध्या घरोघरी खो-खो खोकल्याचे (Cough) रुग्ण दिसून येत आहेत. उपचारानंतरही खोकला बरा होत नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. (Fear of H3N1 after Corona Patients with chronic cough suddenly increased jalgaon news)

मुंबईत ‘H3N1’ विषाणू ‘इन्फ्लूएंझा ए’चा उपप्रकारचा हा कोरोनानंतरचा व्हायरस आढळला आहे. ‘थंडी आणि ऊन’, असे दुहेरी वातावरण असल्याने या विषाणूचे रुग्ण मुंबईत आढळले होते. तसा प्रकार तर खोकला झालेल्या नागरिकांना नाही ना? अशी भिती नागरिकांमध्ये आहे.

आरोग्य विभागाने मात्र असा कोणताही व्हायरस नाही, नागरिकांनी खोकल्यावरील अैषधी घ्यावीत, नाका व तोंडाला मास्क वापरावा, असा सल्ला दिला आहे. शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून नागरिकांना खोकला, ताप, अंगदुखीचा त्रास होत आहे. औषधोपचाराने ताप, अंगदुखी बरी होते. मात्र, खोकला सतत सुरूच आहे.

यामुळे अनेकांच्या स्वरयंत्राला इजा होऊन आवाजही निघत नसल्याचे चित्र आहे. या प्रकारचे रुग्ण प्रत्येक घरोघरी आहेत. घरातील एकाला खोकला झाला, तर इतरांनाही काही दिवसांच्या अंतराने हा त्रास होतो. खोकला बरेच दिवस बरा होत नसल्याने कोरोनानंतरचा व्हायरस आहे का, अशी भिती नागरिकांमध्ये आहे. खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयातही अशाप्रकारचे रुग्ण दररोज येत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी

हे करावे : हात नेहमी स्वच्छ धुवावेत, आजाराची लक्षणे दिसल्यास मास्कचा वापर करा, खोकताना, शिंकताना नाका, तोंडावरून रुमालाचा वापर करावा. द्रवरूप पदार्थाचे अधिक सेवन करा, ताप, अंगदुखीचा त्रास होत असल्याचा डॉक्टरचा सल्लयाने औषधोपचार घावा.

हे करू नये : आजाराची लक्षणे दिसल्यास हस्तांदोलन करू नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, परिसर स्वच्छ ठेवा.

"आपल्याकडे नागरिकांना झालेला खोकला ऋतू बदलानंतर होणारा आहे. मुंबईत कोरोनानंतरचा व्हायरस आला, तो आपल्याकडे नाही. नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास खोकला बरा होतो. हा खोकला घरगुती उपायानेही बरा होणारा आहे." -डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक.

"आपल्याकडे खोकल्याचे रुग्ण आहेत. मात्र, ते दोन ते तीन दिवसांत बरे होतात. काही दिवसांपूर्वी सकाळी थंडी व दुपारी कडक ऊन, यामुळेही नागरिकांना थंडी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास होतो. नागरिकांनी खोकल्याला न घाबरता उपचार करावेत." -डॉ. राम रावलानी, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT