Witchcraft Case esakal
जळगाव

काळ्या बाहुलीवर वकील पत्नीच्या नावे अघोरी विधी; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अमावस्येचा बेत आखत शिवाजीनगर दाळफळ भागात काळ्या बाहुलीवर वकील (Lawyer) पत्नीचे नाव लिहून हळद-कुंकवासह बाहुलीस सुया टोचत काळ्या जादूचा (Black Magic) विधी मांडण्यात आल्याचे उघडकीस आले. याबाबत मंगळवारी (ता. २८) रात्री शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार (Witchcraft Prevention Act) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Filed a case against witchcraft in Jalgaon Jalgaon Crime News)

जिल्‍हा न्यायायलतील ॲड. केदार भुसारी यांच्या पत्नी अंजली भुसारी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी अमावस्येच्या दिवशी दुपारी दीडला वीजपुरवठा खंडित झाला होता. अंजली पती केदार यांना जेवणाचा डबा देण्यासाठी न्यायालयात गेल्या होत्या. तेथून परतल्यावर त्यांना घराच्या दाराजवळ कणकेचा गोळा आढळून आला. त्यावर हळद, कुंकू वाहिलेली काळी बाहुली होती. बाहुलीवर पिवळ्या अक्षरात ‘अंजली’ असे नाव लिहले होते. त्यावर पिवळ्या फुल्या मारून सूया टोचण्यात आल्या होत्या. काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधल्या होत्या. एखाद्या तांत्रिकाने अघोरी विधीसाठी मांडणी करावी अगदी त्याप्रमाणे मांडणी पाहून अंजली यांचा थरकाप उडाला. त्यांनी तातडीने पती केदार यांना फोन करून बोलावून घेतले.

मालमत्तेच्या वादाचा प्रकार

भुसारी यांच्या शेजारीच प्रकाश रामेश्वर व्यास, त्यांची पत्नी ललिता व्यास, सुशील गोपाळ पंडित, विद्या गोपाळ पुरोहित, गौरीलाल रुपचंद पुरोहित ४० ते ४५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ही जागा त्यांच्या सासऱ्यांनी तिघांना वापरण्यास दिली होती. २००७ मध्ये त्यांनी सांगूनही त्यांनी जागा सोडली नाही. त्यावरूनच ते भुसारी कुटुंबीयांशी वैरभावनेने वागत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सातत्याने जादु टोण्याचा प्रकार

भुसारी यांनी तिघांविरुध्द न्यायालयात दिवाणी स्वरुपाचा दावा दाखल केला आहे.त्याचा निकाल २०१७ मध्ये भुसारी यांच्या बाजूने लागला होता. त्याचाच वचपा काढून भिती घालण्यासाठी ३ फेब्रुवारीला दुपारी तीनला घराच्या दरावर, केसांची लट सोबत हळद, कुंकू टाकलेले दिसले. त्यानंतर .१४ जूनला पौर्णिमेच्या रात्री वाळत घातलेल्या कपड्यावर रक्त टाकले होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT