जळगाव

शेतकऱ्यावर आला दुष्काळात तेरावा महिना; संपूर्ण शेत जळून खाक 

उमेश काटे

 अमळनेर  : खौशी (ता.अमळनेर) येथील शेतकरी भरत महादू पवार यांच्या गावालगतच्या शेताला मंगळवारी (ता.30) दुपारी लागलेल्या आगीत एक एकर गव्हाचे शेत जळून खाक झाले. महावितरणचे पोल वरील तारा खंडीत झाल्यामुळे आग ही लागल्याचे निदर्शनास आले आहे.

गावातील लोकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, पण आग आटोक्यात न आल्यामुळे या  गव्हाचे शेत संपूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे या शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान तर झालेच पण त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न देखील व खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यापूर्वी देखील घडली होती घटना..
या शेतावरून गेलेल्या (एम एस.इ बी ) महावितरण च्या पोल वरील  विद्युत तारा शाॅटसर्किटमुळे यापूर्वीदेखील नुकसान झालेले होते. पोल व तारा दुसरीकडे हलवणे संदर्भात एमएसईबी ला यापूर्वी तक्रार अर्ज दिला होता. परंतु वेळोवेळी पातोंडा (ता. अमळनेर) येथील महावितरण विभाग  यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे.  कोरोना महामारी च्या या काळात हे झालेले  नुकसान पाहून गावकर्‍यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तरी सदर शेतकऱ्यास महावितरण कंपनीने नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT