Fire Accident esakal
जळगाव

Jalgaon : ईदगाहासमोरील भंगार बाजारात भीषण आग

, सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील अजिंठा चौकातील ईदगाह कॉम्प्लेक्सशेजारील मार्केटमधील टायर दुकानासह भंगार साहित्याला बुधवारी (ता. १२) सकाळी आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली.

अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या ईदगाह कॉम्प्लेक्सशेजारीच टायर दुकानालगत असलेल्या कचऱ्याला बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. काही क्षणांत आग मोठ्या प्रमाणात पसरून दुकानातील टायर आणि इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.(Fire News Huge fire broke out scrap market in front of Eidgah jalgaon news)

घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. दुकानातून उठत असलेले धुराचे लोट दूरवरून दिसून येत असल्याने उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.

काही मिनिटांच्या आत अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीत जुने-नवे टायर, रबरी साहित्य आणि प्लॅस्टिकचे भंगार साहित्य, भंगार वाहने जळून खाक झाली. यात साधारण पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून, एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.

शॉर्टसर्किटने आग भंगार बाजारात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात असून, वीजतारांमध्ये स्पार्किंग होऊन कचरा पेटून ही आग लागल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT