Firecracker Theft Crime News  esakal
जळगाव

Crime News : फटाका दुकानदारालाच लावले चोरट्यांनी फटाके अडीच लाखांची रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने फटाका व्यवसाय तेजीत आला आहे. याचा गैरफायदा घेत जळगाव शहरातील पोलन पेठेतील एका फटाका होलसेलरचे दुकान फोडून चेारट्यांनी अडीच लाख रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलन पेठ परिसरात बोहरा मशिदीसमोर शब्बीर अमरेलीवाला यांचे महाराष्ट्र फटाका दुकान आहे. दिवाळी सणाला अवघे काहीच दिवस शिल्लक असल्याने मालाची आवक आणि ऑर्डरचे काम सुरू आहे. त्यात दसऱ्याच्या दिवशी आलेली रक्कम शब्बीर अमरेलीवाला नेहमीप्रमाणे काउंटरच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवून दुकान बंद करून निघून गेले.(Firecracker shopkeepers shop theft two and half Lakh Jalgaon News)

दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुकानावर काम करणारी तरुणी योगिता चौधरी तसेच दुकानमालकांचे वडील इलियास अमरेलीवाला दुकानावर पोचल्यानंतर ड्रॉव्हर तोडलेल्या अवस्थेत आढळले.

कुणीतरी चोरट्याने दुकानाचे ड्रॉव्हर तोडून आतील दोन लाख ५४ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग आणि कागदपत्रे असलेली दुसरी पिशवी हे साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी शब्बीर अमरेलीवाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार विजय निकुंभ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT