Green Hydrogen Generation esakal
जळगाव

Green Hydrogen Generation: भुसावळला ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प; पहिला पायलट प्रोजेक्ट

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : राज्याच्या अर्थसंकल्पात भुसावळला सुमारे पंधरा कोटी रुपये खर्चाचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प मंजूर झाल्याने पर्यावरणप्रेमींना आनंद झाला आहे. राज्यातील हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट असेल.

या प्रकल्पात सौरऊर्जा या अक्षय ऊर्जेचा वापर होणार असल्याने हा पर्यावरणपूरक प्रकल्प असेल, याचे समाधान वाटते, असे मत पर्यावरण तज्ज्ञ व उपज संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले.

चौधरी पुढे म्हणाले, की भुसावळ परिसरातील वीजनिर्मिती प्रकल्पात ग्रीन हायड्रोजनचा वापर होणार ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी सौर ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जास्त्रोत उपयुक्त ठरेल. थोडक्यात हा पर्यावरण संरक्षणासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त निर्णय आहे.

भुसावळला मंजूर झालेला प्रकल्प पाचशे किलो वॅटचा असून, सोलर एनर्जी व इलेक्ट्रोलायझर वापरून ग्रीन हायड्रोजन निर्माण केला जाईल. भविष्यातील ग्लोबल वार्मिंग व क्लायमेट चेंज रोखण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज भासणार आहे, असे चौधरी म्हणाले.

''हा प्रकल्प औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला लागणाऱ्या हायड्रोजन निर्मितीसाठी उपयुक्त असून, सौरऊर्जेच्या वापरातील प्रगतीचे पाऊल ठरणार आहे.'' - डी. के. पाटील, पर्यावरण कार्यकर्ते

''या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होऊन फॉसिल फ्युएल म्हणजेच कोळशाची बचत होऊन पर्यावरणाची हानी कमी करण्यास सहाय्यभूत ठरेल.'' प्रा. वसंत खरे, अध्यक्ष ग्रीन अर्थ फाउंडेशन, भुसावळ

''भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात हायड्रोजन निर्मिती होते, ती फक्त सौरशक्तीद्वारे होणार आहे. अर्थात हा पायलट प्रोजेक्ट असून, त्याचे परिणाम लक्षात घेऊन भविष्यात हा प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात राबविला जाऊ शकतो. प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चितच उपयुक्त आहे.'' - संजय सावकारे, आमदार, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT