Puzzle parking facility next to R. C. Bafna Jewellers  new showroom
Puzzle parking facility next to R. C. Bafna Jewellers new showroom esakal
जळगाव

Puzzle Parking : खानदेशातील पहिली ‘पझल पार्किंग’ जळगावात; वाहतूक कोंडीवर उपाय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वाढत्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण शक्य नाही. वाहतुकीसाठी रस्ते आणि वाहने उभे करण्यासाठी वाहनतळ अपुरी पडू लागली आहेत. त्यावर उपाय म्हणून काही वर्षांत बहुमजली वाहनतळांसह ‘पझल पार्किंग’चा पर्याय समोर आला असून, खानदेशातील पहिलीच ‘पझल पार्किंग’ सुविधा जळगावात उपलब्ध झाली आहे. (first puzzle parking facility in Khandesh became available in Jalgaon news)

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे नवीन स्वर्णदालन ‘नयनतारा-३’ नुकतेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे. नयनतारा २ भवानी पेठ शोरूमच्या अगदी लागूनच विश्वसनीय परंपरेला आधुनिकतेचा साज देणारे नवे दालन अनेक सेवा-सुविधांनी सुसज्ज असून, खानदेशातील पहिली बहुमजली ‘पझल पार्किंग’ सुविधा दोन्ही शोरूममध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

वाहनांच्या गर्दीवर उपाय

शहरातील प्रमुख बाजारपेठेत जवळपास सर्वच ठिकाणी पार्किंगची समस्या निर्माण होते. भवानीपेठेत आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या दालनालगत ही समस्या अधिक तीव्र आहे. त्यावर उपाय म्हणून दोन्ही शोरूमला लागूनच आधुनिक स्वयंचलित पझल पार्किंग सुविधा करून दिली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अशी आहे रचना

हायड्रॉलिक तंत्रज्ञानावर आधारित या पार्किंगमध्ये कारसाठी स्वतंत्र झोन तयार केले आहेत. तर याच पझल पार्किंगच्या बेसमेंटला दुचाकीसाठी पार्किंग आहे, तर शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून शोरूमचे कर्मचारी चारचाकी वाहन ताब्यात घेतात.

कारला हायड्रॉलिक रॅम्पच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर असलेल्या जागेत पार्क करतात. तसेच ग्राहकांची खरेदी पूर्ण झाल्यावर त्यांचे वाहन पुन्हा गेटवर आणून ग्राहकाच्या स्वाधीन केले जाते. त्यामुळे ग्राहकांचा वेळ तर वाचतोच शिवाय त्यांचे वाहन ऊन, ट्रॅफिक यासारख्या समस्येपासून सुरक्षित राहते‌.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT