District Collector Ayush Prasad while inspecting the place where trees were felled. Along with forest department officials. esakal
जळगाव

Jalgaon News : वनविभाग देवझरी रेंजमध्ये तब्बल ३०० वृक्षतोड; 3 दिवसांतील प्रकार

यावल वनविभागाच्या देवझरी रेंजमधील कम्पार्टमेंट क्रमांक १६६ मध्ये, १, ७ आणि ९ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री अज्ञात व्यक्तींनी ३०० झाडे तोडल्याची नोंद वनविभागाने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : यावल वनविभागाच्या देवझरी रेंजमधील कम्पार्टमेंट क्रमांक १६६ मध्ये, १, ७ आणि ९ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री अज्ञात व्यक्तींनी ३०० झाडे तोडल्याची नोंद वनविभागाने केली आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (forest department has reported that 300 trees have been cut down by unknown persons in Deozari range of forest department jalgaon news)

राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वृक्षांची कत्तल करून लाखो रुपयांची हानी झाली आहे. राष्ट्रीय साधन संपत्तीचा ऱ्हास झाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. दोषींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

बेकायदा वृक्षतोडीची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. देवझरी रेंज महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सिमेलगतचा भाग आहे. याठिकाणी नागरी वस्ती करण्याच्या हेतूने वृक्षतोड झाली आहे.

यामुळे मध्य प्रदेशाचा वनविभाग व जळगावचा वन विभाग, एसआरपीएफ स्टाफच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे प्रकार यापुढे घडणार नाही यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले.

उपवनसंरक्षक यावल वनविभाग, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा, उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर, उपविभागीय पोलिस अधिकारी चोपडा, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा, पोलिस निरीक्षक चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन चोपडा यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या अवैध वृक्षतोडीची जागेवर पाहणी केली. घटनेबाबत तत्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना घेतल्या.

हेल्पलाईनवर संपर्काचे आवाहन

वन गुन्ह्याबाबत काही माहिती असल्यास वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट १९२६ या हेल्पलाईनवर कॉल करून माहिती द्यावी व वनजमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी जंगलाची तोड करू नये, याबाबत स्थानिक लोकांना यावल वनविभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

या वनगुन्हयातील आरोपी बाबत मध्य प्रदेशातील उपवनसंरक्षक सेंधवा (मध्य प्रदेश) व वनपरिक्षेत्र अधिकारी, धवली (मध्य प्रदेश) यांच्याशी संपर्क साधुन सदर वनगुन्हयातील आरोपी शोधण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. वृक्षतोड झालेल्या भागात दिवस-रात्र गस्त सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT