जळगाव

पाटणादेवी जंगलात वन्यजीव विभागाकडूनच जिवंत झाडांची कत्तल ?

आनंन शिंपी

चाळीसगाव : पाटणादेवी (ता. चाळीसगाव) जंगलात चक्क वन्यजीव विभागाकडूनच जिवंत झाडे इलेक्ट्रीक कटरच्या साहाय्याने तोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यासंदर्भात क्राईम ॲन्ड करप्शन कंट्रोल असोसिएशनने राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नागपूर तसेच अपर प्रधान मुख्य संरक्षक पश्चिम विभाग यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, चौकशी समिती नियुक्त केली असून, ही समिती घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार आहे. या चौकशीकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.  


विपुल वनसंपदा असलेल्या पाटणादेवीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. क्राईम ॲन्ड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण, वनमजूर जगन मोरकर व वनमजूर रामचंद्र पाटील यांनी संगनमताने २६ डिसेंबरला पाटणादेवी अभयारण्यातील पथिकाश्रम येथील जुन्या नर्सरीतील संरक्षित क्षेत्रात दिवसाढिवळ्या काही जिवंत झाडांची इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्याने कत्तल केली. दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने पिंपरखेड (ता. चाळीसगाव) येथील एका लाकूड व्यापाऱ्याला ३० हजारांना ही लाकडे विकली. या माहितीनुसार, असोसिएशनच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य तपास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीचे गांभार्य लक्षात घेऊन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर, अपर प्रधान मुख्य संरक्षक पश्चिम विभाग मुंबई, विभागीय वनसंरक्षक औरंगाबाद व मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली. भारतीय दंड संहितेनुसार संरक्षित क्षेत्रात असे कृत्य करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार दंडनीय अपराध आहे. या तक्रारीवरून घडलेल्या प्रकाराची चौकशीसाठी विभागीय वन अधिकाऱ्यांनी लगेचच समिती स्थापन केली असून, दोन दिवसांत समितीला आपला अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. 
दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. 


चौकशी अहवालाकडे लक्ष 
चौकशीत स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे कर्मचारी दोषी आढळून आले, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चौकशी अहवालाकडे वन्यप्रेमींसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT