MLA Sanjay Savkare and office bearers during the Holi of additional tax increase notices in the municipality. esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळला अतिरिक्त करवाढीच्या नोटिशींची होळी; नवीन कर आकारणीप्रश्‍नी प्रशासनाचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील नागरिकांना पालिकेच्या चुकीमुळे व नेमलेल्या एजन्सीमुळे अव्वाच्या सव्वा कर आकारण्यात आलेला आहे. या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय सावकारे व माजी नगरसेवकांनी पालिकेचा हल्लाबोल करीत निषेध करून अतिरिक्त करांच्या नोटिशींची होळी केली. (Former corporators including MLAs protest administration over new tax levy jalgaon news)

पालिका हद्दीत नवीन पाच हजार घरांचे बांधकाम करण्यात आले. तसेच, गेल्या २० ते २५ वर्षांपासून पालिकेचा २७ कोटी कर थकीत आहे.

तो वसूल करण्यासाठी पालिकेने एजन्सी नेमून शहरातील सर्व घरांचे तसेच शासकीय कार्यालयांचे, मंदिर, मशिद, बुद्धविहार, पार्किंग याचे मोजमाप करून अव्वाच्या सव्वा कर आकारून सरळ नोटिसा बजावल्या आहेत. चार वर्षांतून १० टक्के करवाढ करणे योग्य आहे. मात्र, अतिरिक्त कर वाढविल्याने पालिकेविरुद्ध नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरील पालिकेने अतिरिक्त करवाढ कमी करावी, यासाठी आमदार सावकारे व माजी नगरसेवकांनी मंगळवारी (ता. ३१) पालिकेत अयोग्य कर वसूल करणाऱ्या पालिकेचा निषेध केला. तसेच, बनावट याद्या रद्द करण्यास सांगितले.

ही चूक पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी मान्य केली असून, कराबाबत नवीन याद्या १५ दिवसांत तयार करण्यात येतील. तोपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ करण्यात येईल. ज्या चुका झाल्या आहेत, त्या तत्काळ सुधारण्यात येतील, असे सांगितले. या वेळी आमदार सावकारे, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी तसेच माजी नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT