Smita wagh esakal
जळगाव

Jalgaon News : माजी आमदार स्मिता वाघांवर विधानसभा निवडणूक जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच जाहीर केल्या असून, यात अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख म्हणून भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्तीबाबतचे पत्र भाजप प्रदेश कार्यालयाकडून ८ जूनलाच प्रसिद्ध झाले आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार असतील तेथे आमदारांना तर जेथे आमदार नसतील तेथे माजी आमदार किंवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. (Former MLA Smita Vaghaver Assembly election responsibility Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या नियुक्त्या लक्षात घेता भाजपने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मिता वाघ यांनी आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम कामगिरी बजावली असून, सोबतच जिल्हा पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी काळजीने सांभाळल्या आहेत.

सद्यःस्थितीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांच्यावर असताना पक्षाने त्यांच्यावर अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख म्हणून दुसरी मोठी जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे भाजप नेते तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT