Tips to Control High Blood Pressure Sakal
जळगाव

उच्च रक्तदाबाला कंट्रोल करणार फॉर्म्युला

उमवितील प्राध्यापकासह तिघांचे टॅबलेट संशोधनास पेटंट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. जितेंद्र नाईक, औरंगाबादचे डॉ. आनंद कुलकर्णी आणि वाशिमच्या विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे संचालक डॉ. संजय तोष्णीवाल यांनी उच्च रक्तदाबाच्या आजारावर उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या टॅबलेटच्या फॉर्म्युल्यावरील संशोधनाला भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे. (How to Control High Blood Pressure)

उच्च रक्तदाब हा जुनाट आजार असून भारतात दरवर्षी उच्च रक्तदाबामुळे हृदयरोग व हृदयविकार होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. योग्य पद्धतीने काळजी घेतली तर उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

असे आहे संशोधन

प्रा. नाईक, डॉ. कुलकर्णी व तोष्णीवाल यांनी उच्च रक्तदाबाच्या आजारावर उपचार करण्यासाठी नवीन फॉर्म्युला विकसित केला आहे. तो शाश्वत स्वरूपाचा आहे. सध्या रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना दिवसांतून दोन अथवा तीन वेळा गोळ्या घ्याव्या लागतात.

अशी आहे उपयुक्तता

या संशोधनात जो फॉर्मुला विकसित केला आहे, त्यात एकवेळा ही टॅबलेट घेतली तरी २४ तास त्याचा प्रभाव कायम राहू शकतो. हृदय विकाराचा झटका आणि मूत्रपिंडाच्या समस्या टाळण्यास त्यामुळे मदत होणार आहे. या फॉर्मुल्याला भारत सरकारकडून पेंटट प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Latest Jobs : काम न करता मिळणार 3.7 कोटी रुपये पगार? OpenAI ने आणली अशी नोकरी, जाणून मोठमोठ्या इंजीनियर्सचं डोकं चक्रावलय

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT