crime  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime News : इच्छापत्रात गैरइच्छेने फेरबदल करून फसवणूक; चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime News : इच्छापत्रात असलेल्या मिळकतीच्या हिश्श्यात बदल करून त्यावर मयतची बनावट स्वाक्षरी व अंगठा लावून फसवणूक केल्याप्रकरणी जयेश मुकेश ललवाणी, रोहन मुकेश ललवाणी (दोघे रा. शिरसोली रोड) राजेश शांतिलाल ललवाणी (रा.जयनगर) व अजय शांतिलाल ललवाणी (रा. शिरसोली रोड) अशा चौघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud by maliciously altered will jalgaon fraud crime news)

आर्किटेक्ट दिलीप आनंदा कोल्हे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.जळगावच्या मौजे मेहरूण शिवारात (४६४/१) मध्ये फिर्यादीसह राजेश ललवाणी, (कै.) मुकेश शांतिलाल ललवाणी (दोघे रा. जयनगर) व श्रीराम गोपालदास खटोड अशा चौघांनी मिळून १३ नोव्हेंबर २००१ रोजी अदलाबदल खत दस्त क्र. ६३५१ नोंदणीकृत दस्तान्वये घेतली आहे.

यापैकी मुकेश ललवाणी हे ५ ऑक्टोबर २०२० रोजी मयत झाले आहेत. दिलीप कोल्हे यांना मुकेश ललवाणी यांचे इच्छापत्र १५ जून २०२१ रोजी मिळाले. इच्छापत्रातील जयेश ललवाणी व रोहन ललवाणी यांनी त्या मिळकतीची विभागणी केली.

त्या मिळकतीवर साक्षीदार म्हणून राजेश ललवाणी व अजय ललवाणी यांच्या सह्या आहेत. आर्किटेक्ट दिलीप कोल्हे यांनी कागदपत्रांची तीन हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी केली. त्या तपासणीत सही व अंगठा खोटा असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

इच्छापत्राच्या आधारे संबंधित तलाठी यांनी मयत मुकेश यांचे वारस म्हणून जयेश व रोहन ललवाणी यांच्या नावाची नोंद उताऱ्यात केल्याचे फिर्यादीत म्हटले. या दाखल गुन्ह्याचा पोलिस उपनिरीक्षक प्रदिप बोरुडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT