Cheat of Rupees 3 Lakh esakal
जळगाव

Crime Case : 3 लाखाची फसवणूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : चारचाकी घेण्यासाठी दिलेले तीन लाख रुपये परत न करता वाहनही देत नसल्याने एकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुनील रघुनाथ चव्हाण (रा. शिव प्लाझा, अमळनेर) याचे पाच ते सहा वर्षांपासून समीर सर्जेराव पाटील (रा. नाशिक) याच्याशी ओळखीचे संबंध होते.

त्यांनी सुनील चव्हाण यांना स्विफ्ट डिझायर विकत घेण्यासाठी दूरध्वनीवरून कळविले होते व गाडीची छायाचित्रे व्हॉट्सॲपवर पाठविली होती. चव्हाण यांना गाडी आवडल्याने त्यांनी ही तीन लाखांत व्यवहार केला.(Fraud of 3 lakh Case registerd Jalgaon Crime News)

त्यांपैकी दोन लाख रुपये बँकेतून एनएफटी करून दिले. त्यांनतर ८ नोव्हेंबर २०२१ ला समीरने एक लाख रुपयांची मागणी केली असता. तेही एनएफटी करून दिले होते.

वाहनावर बोझा असल्याने तो निल करून आठ ते दहा दिवसांत गाडी अमळनेरला पाठवितो, असे सांगितले. मात्र वेळोवेळी काहीना काही कारण सांगून गाडी देण्यास टाळाटाळ करीत असून, पैसेही परत करत नाही म्हणून समीर पाटील याच्यावर अमळनेर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस शिपाई सुनील हटकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT