जळगाव

जीएसटी इंटेलिजेंस पथकाच्या धाडीत स्टील कंपनीच्या जागी चक्क मेडिकल 

सचिन जोशी

जळगाव : डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंस (डीजीजीआय)  अर्थात वस्तू व सेवाकर गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाने जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे धाड टाकल्याची माहिती समोर आहे. यात स्टील कंपनीचा पत्ता असलेल्या ठिकाणी चक्क मेडिकल सुरु असल्याचे समोर आले. याप्रकरणी डीजीजीआयच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. 

डीजीजीआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिजभूषण त्रिपाठी यांच्या पथकाने ही धाड टाकली होती. त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. 


गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने ३ मार्चला जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे धाड टाकली आणि पंचनामा केला. या पथकात वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिजभूषण त्रिपाठी यांच्यासह गुप्तचर अधिकार सत्येंद्रकुमार शर्मा यांचा समावेश होता. या पथकाजवळ असलेल्या सर्च वॉरंटवर (क्र. ३०/२०२०-२१) हे नागपूर येथील डीजीजीआयचे अॅडीशनल डायरेक्टर प्रदीप गुरुमूर्ती यांची स्वाक्षरी होती. या पथकाने गावातीलच निलेश घोंगडे (वय २५, रा. पहूर कसबे) आणि सतीश जाधव (वय २६, रा. पहूर कसबे) या दोन पंचांना धाडसत्राचा उद्देश सांगत आपल्या सोबत घटनास्थळी नेले. दरम्यान, केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाच्या जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने पहूरमध्ये वस्तू व सेवा कर चुकवेगिरीचा एक मोठा घोटाळा शोधून काढला, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. परंतु याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीसोबत संपर्क होऊ न शकल्याने अधिकृत कुणाचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 


अन्‌ मालक कुणी दुसराच  
आयकर भरणारे एम/एस. कृष्णा स्टील (GSTIN २७ BXRPK१२२८BIZM) आणि ए. एस. स्टील (GSTIN २७KENPS०९४८A1Z5) या दोघ कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा १३७३, संतोषीमातानगर, पहूर पेठ, पहूर असा होता. परंतु पथकाला ही जागा आणि त्यांचे मालक बराच वेळ सापडले नाहीत. बऱ्याच प्रयत्नानंतर अधिकाऱ्यांनी कृष्णा स्टीलचे मालक प्रवीण कुमावतशी मोबाईलवरून संवाद साधला. तेव्हा त्यांना कळले की, ए. एस. स्टीललॅडचे अशोक सुरवाडे हे मालक आहेत. त्यानंतर प्रवीण कुमावत यांनी अधिकाऱ्यांना फोनवर सिव्हील हॉस्पिटल समोरील संतोषी मातानगर येथे पोहचण्यास सांगितले. घटनास्थळी अधिकारी आणि पंच पोहचत नाही तोच तेथे प्रवीण कुमावत पोहचला. त्याने संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या वेदांत मेडिकल आणि जनरल स्टोअर्सवर नेले. त्याठिकाणी दुकानात फार्मसिस्ट तौसीफ खान हा उपस्थित होता. अधिकाऱ्यांनी प्रवीण कुमावतची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, कृष्णा स्टील ही फर्म पिंटू इटकारेने माझ्या नावावर तयार केली. तसेच या मोबदल्यात त्याने मला ८ महिने ८ ते १२ हजार रुपये महिना देत होता. तसेच संबंधित पत्त्यावर कृष्णा स्टीलशी संबंधित कुठलास व्यवसाय येथे चालत नाही. त्याच प्रकारे या कंपनीशी संबंधित कोणतेच कागदपत्र या ठिकाणी उपलब्ध नाहीत. 

संपादन- भूषण  श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT