CRIME 
जळगाव

मध्यरात्रीची शांतता, आणि शेतात अचानक झाली पळापळ; कशासाठी तर वाचा ! 

बापू शिंदे

तरवाडे(ता.चाळीसगाव) : न्हावे ता.चाळीसगाव येथील एका ढाब्या जवळील शेतात रात्री बारा वाजाच्या अंधारात व शांततेत जुगाराचा डाव सुरू होता. आणि अचनाक जुगारी खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाल्याची घटना घडली. 

शनिवारी रात्री बाराच्या सुमारास शेतात जुगार अड्यावर छापा मारला यात चार जुगार खेळणारे ताब्यात तर बाकी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव ग्रामिण पोलीसांनी कंबर कसली असून असे धाडसत्र सुरुच राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अशी झाली कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगीरी न्हावे तरवाडे रोडलगत न्हावे येथे गोल्डन पावभाजी ढाब्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्यावर ता. 19 रोजी रात्री 11वाजून50 मिनीटांच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा मारून सात मोटारसायकल अंदाजे सुमारे दोन लाख दहा हजार सहाशे सत्तर रुपये किमतीच्या जप्त केल्या तर दोन हजार सहाशे सत्तर रुपये रोख व पत्यांचे कॕट हस्तगत करत चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शिवाय न्हावे,तरवाडे परिसरात अनेक ठिकाणी देशी, विदेशी, गावठी हातभट्टीची विनापरवाना दारूची विक्री होत असल्याची चर्चा गावभर होत होती पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ होत आहे. शेतातील अनेक शेतीपंप चोऱ्या होऊन एकही चोरी आजपर्यत उघड होत नसल्याने अशा कारवाया जर पोलीसांनी नेहमी केल्या पाहिजे अशी मागणी गावातून होत आहे.

यांनी केली कारवाई 
जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्हायक पोलीस निरिक्षक धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक संपत आहेर, पोलीस कर्मचारी बिभीषण सांगळे व चार होमगार्ड कर्मचारी यांनी हि कारवाई केली.

यांना अटक झाली

जुगार खेळणारे प्रवीण दिनकर पिलोरे, समाधान अशोक पवार, रमेश कौतीक शेलार रा.न्हावे ता चाळीसगाव व ज्ञानेश्वर पितांबर राठोड रा.तरवाडे ता चाळीसगाव यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT