arretsed
arretsed esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जुगार अड्ड्यावर छापा; 8 अटकेत, पावणेपाच लाखांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : दरेगाव (ता. चाळीसगाव) येथे उपखेड रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या पथकाने छापा टाकला.

त्यात पथकाच्या हाती ८ जुगारी लागले तर ४ जण पळून जाण्यास यशस्वी ठरले. पोलिसांनी अंगझडतीत सापडलेल्या रकमेसह जुगारींच्या सहा दुचाकी असा सुमारे ४ लाख ८३ हजार ६३० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gambling den raided 8 Arrested 5 Lakhs seized Jalgaon Crime News)

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरेगावजवळ दरेगाव ते उपखेड रस्त्यालगत एका ठिकाणी वाहनांच्या आडोश्याला झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना मिळाली असता त्यांच्यासह संभाजी पाटील,

राजेंद्र निकम, श्रीराम सांगवे, विश्वनाथ देवरे, राहुल जाधव, राहुल महाजन, महेश बागूल, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे हवालदार मोहन सोनवणे, भूषण बाविस्कर यांनी बुधवारी (ता.१२) पहाटे हा छापा टाकला.

या ठिकाणी १० ते १२ जण पत्ते खेळत असल्याचे दिसून आले. हे जुगारी बेसावध असताना पथकाने छापा टाकून ८ जणांना जागीच पकडले तर ४ जण पळून गेले. पकडलेल्या जुगारींची अंगझडती घेण्यात आली.

त्यांच्याकडून रोख रकमेसह ६ दुचाकी असा ४ लाख ८३ हजार ६३० रुपयांचा ऐवज जप्त केला. या वेळी एक जुगारी दुचाकीसह फरार झाला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या ठिकाणी जुगार खेळणारे हे दरेगाव, देवघट, चिंचगव्हाण, उंबरखेड, देवळी येथील असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या कारवाईत निवृत्ती वाल्मीक माळी, प्रदीप नारायण पाटील, दगडू रंगराव बच्छे, विलास कैलास सोनवणे (चारही रा. दरेगाव), प्रकाश झावराव जाधव, शरद परशुराम पगार, भरत भाऊसाहेब (दोन्ही रा. देवघट, ता. चाळीसगाव),

महेंद्र नाना सोनवणे (चिंचगव्हाण), कलिम मिराज सय्यद (उंबरखेड) यांना ताब्यात घेतले तर शुभम कोठारी (पूर्ण नाव माहित नाही) उंबरखेड, वासिम मोमीन (पूर्ण नाव माहित नाही) उंबरखेड अमोल कसारे (पूर्ण नाव माहीत नाही) देवळी हे फरार झाले आहेत.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी विश्‍वनाथ देवरे यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट सहायक पोलिस अधीक्षकांनीच या जुगार अड्ड्यावर कारवाईचा बडगा उगारल्याने जुगाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अक्षय तृतीया दहा दिवसांवर आल्याने ग्रामीण भागात जुगार सुरू झाल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT