jalgaon sakal
जळगाव

सुदृढ प्रशासनासाठी गांधी विचार अपरिहार्य : डॉ. प्रवीण मुंढे

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महात्मा गांधीजींच्या विचारांची सुदृढ प्रशासनासाठी आजही अपरिहार्यता आहे. आजच्या काळात पोलिस व नागरिकांनीदेखील महात्मा गांधीजींचे विचार अवलंबले, तर सर्व काही सुरळीत होईल. गांधीजींचा विचार अभ्यास, विचारांपुरता मर्यादित न ठेवता गांधी विचाराने प्रत्यक्ष जगणं आवश्यक आहे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. ‘महात्मा गांधी आणि पोलिस’ याबाबत झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

गांधीतीर्थ येथील कस्तुरबा हॉलमध्ये विश्व अहिंसा दिवस, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती झाली. सुरवातीला दोन्ही महनीय पुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार आणि पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निखिल क्षीरसागर, भूषण गुरव व अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेन्सीच्या विद्यार्थांनी ‘वैष्णव जन तो तेने कही ये...’ हे भजन सादर केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आश्विन झाला यांनी वर्षभरात पार पडलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. नितीन चोपडा यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रीय पातळीच्या एकांकीका स्पर्धेचा निकाल गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांनी जाहीर केला.

स्वानुभूतीसाठी पीस वॉक

आजच्या प्रसंगी पहाटे जैन हिल्सवर ‘स्वानुभूती’साठी ‘पीस वॉक’ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची भूमिका समजावली. गांधीतीर्थचे डॉ. अश्विन झाला यांनी आपल्या जीवनात पंचमहाभूत तत्त्वांचे महत्व विशद केले. अग्नि, वायू, जल, पृथ्वी, आकाश है मानव जीवनात पदोपदी कसे उपयोगी सिद्ध होतात, आपल्याला वेगळी दृष्टी देतात या वॉकच्या निमित्ताने त्याची अनुभूती यावी.

‘पीस वॉक’मध्ये पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा, भास्कर डेरे, बाबासाहेब ठोंबे, अंबादास मोरे, रामकृष्ण कुंभार, सुरेश शिंदे, संतोष सोनवणे, वी. डी. ससे हे वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच पत्रकार दिलीप तिवारी, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व नितीन चोपडा सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT