Gang Fight latest jalgaon crime news esakal
जळगाव

जळगाव : महाविद्यालयीन तरुणांमध्ये गँगवार; चाकू-फायटरसह हाणामारी

गोलाणी मार्केट व्यापारी संकुलातील अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट व्यापारी संकुलातील अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. क्लासमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून बाहेरून टोळी बोलावून दोन्ही गट समोरासमोर भिडले. यात, एकाच्या कंबरेत चाकू खुपला असून समोरील तरुणाच्या डोक्यात फरशी टाकल्याने तो जखमी झाला. रात्री उशिरापर्यंत जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील जुने जळगाव आंबेडकरनगरात बॉम्बे किराणा स्टोअर्सजवळ राहणाऱ्या साईम अकिल पिंजारी (वय १८) याने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, तो आणि त्याचा चुलत भाऊ अर्शद निसार पिंजारी असे दोघेही पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील खासगी क्लासमध्ये शिक्षण घेत असून तेथे धक्का लागल्याच्या कारणावरून आदित्य खडके याच्याशी वाद होऊन शिवीगाळ झाली होती.

दोघेही पिंजारी बंधू घराकडे निघाले असताना गोलाणी मार्केट समोरील सलूनजवळ मित्र अबुजर मोहम्मद साबीर पिंजारी, सय्यद अब्रार असे मोबाईल दुरुस्तीसाठी बोलत थांबले असताना आदित्य खडके त्याच्या ५ ते ६ साथीदारांसह तेथे धडकला क्लासचे भांडण उकरुन काढत तेथे वाद होऊन दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने घमासान हाणामारी झाल्याची घटना घडली. यात, साईम पिंजारी याच्या डोक्यात कोणीतरी फरशी टाकल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. तर, अर्षद पिंजारी याच्या तोंडावर लागल्याने जखमींना जिल्‍हा रुग्णालयात हलवण्यात आले.

कंबरेत खुपसला चाकू

हाणामारीत समोरच्या गटातील दोन जखमी झाले असून जयेश किशोर जावरे (वय १८) याने दिलेल्या तक्रारीवरून त्याच कारणावरून पिंजारी भावंड व त्यांच्या सोबतच्या इतरांनी मारहाणी दरम्यान चाकू सारख्या तीक्ष्ण हत्यार कंबरेत खुपसल्याने जयेश जावरे जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते.

खुनाची अफवा...

शहरात खुनाच्या घटना या सामान्य झाल्या असून प्रत्येक महिन्यात तशा एक दोन घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शहरात मुख्य बाजारपेठेत दोन्ही गटातील तरुण एकमेकांच्या जीवावर उठलेले पाहून परिसरात प्रचंड गर्दी उसळली. दोन-तीन तरुणांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आल्याने प्रत्यक्षदर्शींन थेट खुनाची अफवा पसरवली. हाणामारी प्रसंगी तब्बल अर्धा ते पाऊण तास या मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT