crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पाचोऱ्याचा गौरव पाटील ‘एटीएस’च्या कोठडीत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी (ता. १३) ठाण्यातून गौरव पाटील याला अटक केली.

तो नौदलाच्या गोदीत काम करीत होता. गौरवला अहमदाबाद येथील तरुणीने फसवल्याचीही माहिती समोर आली आहे.(Gaurav Patil in ATS custody in pachora jalgaon crime news)

गौरव कुटुंबीयांसह पाचोरा येथे वास्तव्यास आले. त्याचे वडील बांधकाम मजूर असून, धुणी-भांडी करून आईनेही संसारला हातभार लावला. गौरव लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. दहावी, बारावीनंतर त्याने पदवी मिळवली.

दरम्यान, त्याने डिझेल मॅकेनिकलचे शिक्षणही पूर्ण केले. मुंबई नेव्हल डॉकची जाहिरात बघून त्याने अर्ज केला. परीक्षा पास झाल्यावर वर्षासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागला. गौरव फेसबुकच्या माध्यमातून अहमदाबाद येथील तरुणीच्या संपर्कात आला.

त्यानंतर तरुणीने त्याच्याकडून नेव्हल बेसवर असल्याचे छायाचित्र मिळवले. काही किरकोळ रक्कमही त्या मुलीने गौरवला पाठवली. ऑक्टोबरपासून गौरव यंत्रणाच्या रडारवर आला. महिनाभर रोज त्याची चौकशी सुरू होती.

सोमवारी (ता. ११) गौरवला ‘एटीएस’कडून बोलावणे झाले. गौरव व त्याचे वडील एटीएस ऑफिसला पोचल्यावर अधिकाऱ्यांनी गौरवला अटक केली. न्यायालयाने गगौरवला पोलिस कोठडी सुनावली.

माझा गौरव निर्दोष

गौरव पोलिस किंवा देशसेवेत जाण्यासाठी मेहनत घेत होता, कधी माझ्यासोबत तर कधी पेट्रोलपंपावर काम करून त्याने शिक्षण पूर्ण केले. तो असं करूच शकत नाही. माझा पोरगा देशभक्त आहे, तो देशासोबत गद्दारी करेल, या गोष्टीवर माझाच काय कुणाचाही विश्वास बसणार नाही, असे गौरवचे वडील अर्जुन पाटिल यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT