suspect gaurav, shankar, mahesh arrested latest crime news esakal
जळगाव

Jalgaon : किराणा दुकान फोडून ‘गेंदा’ टोळीने गाठली मुंबई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : किराणा दुकान फोडणाऱ्या (Burglary) तिघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

दुकान फोडीत हार्डकॅश सापडल्याने गुन्ह्यात सहभागी पाचही संशयितांनी आणखी एकाला घेत रातोरात मुंबई गाठल्याची माहिती अटकेतील शंकर विश्वनाथ साबणे, गौरव जगन साळुंखे व महेश संतोष लिंगायत या तिघांनी दिली आहे. गेंदालाल मिलच्या या टोळीचे इतर दोन साथीदार अद्याप फरार आहेत. (Genda gang reached Mumbai after robbed grocery shop latest crime marathi news)

जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात आनंद नागला यांचे मदनलाल पांडुरंग नागला या नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटवून त्यातील ९० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती.

शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी २ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. तपास सुरु असताना पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदाराने कळवले की, गेंदालाल मिलमधील अट्टल घरफोड्या शंकर व त्याच्या साथीदारांनी दुकान फोडले आहे.

या माहितीचा पाठपुरावा करण्यासाठी जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे अशांच्या पथकाने शंकर साबणे यास ताब्यात घेत अटक केली. चौकशीत त्याने गौरव जगन साळुंखे व महेश संतोष लिंगायत अशा तिघांचे नाव कबूल केल्यावर त्यांना अटक करण्यात आली. तिघा संशयितांसह या गुन्ह्यात इतर दोन साथीदार असून त्याचा शोध सुरु आहे.

मुंबईत छम्मा छम्मा...

दुकान फोडल्यावर चोरट्यांनी आणखी एकाला सोबत घेत मुंबई गाठली. मुंबईत पोचल्यावर दारु-मटण, रात्री डान्सबारमध्ये हैदोस घातल्यावर दुसऱ्या दिवशी कामाटीपुरात रात्र काढत पैशांचा चुराडा करत जळगाव गाठले.

काहीएक कामधंदा नसताना, अंगात महागडे कपडे, बूट, घड्याळ असा राहणीमान बदलल्याने याची भनक गुन्हे शाखेला लागली आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. मुंबईत त्यांच्या सोबत मज्जा करुन आलेल्या एकाला पोलिसांनी गोंजारल्यावर त्याने सर्व पिक्चर उघडा केल्याने गुन्ह्याचा उलगडा झाला.

जळगाव-मुंबई शटल गुन्हेगारी

अटकेतील शंकर साबणे, गौरव सांळुखे व महेश लिंगायत यांच्यासह फरार संशयित फिरोज शहा, जुबेर शेख अशांची ‘गेंदाची टोळी’ म्हणून कुख्यात असून घरफोड्या, मोबाईल चोरी सारखे इतरही गुन्हे त्यांच्यावर आहेत.

मोठा हात मारल्यावर मौज मजेसाठी मुंबई गाठायची. जाताना रेल्वे डब्यांत, पोचल्यावर गर्दीच्या ठिकाणी पाकीटमारी करत मिळेल त्या चोऱ्या करून मौजकरुन पुन्हा जळगावी परतायचे, असा त्यांचा नित्यक्रम आहे. जळगाव-मुंबई, जळगाव-सुरत अशा शटल गाड्यांप्रमाणे येत-जात चोरीचा धंदा या टोळीचा असल्याची माहिती संशयितांकडून मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT