Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news esakal
जळगाव

Jalgaon News : अविश्‍वास प्रस्तावावर आज महासभा; प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी 45 सदस्यांची उपस्थिती आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्‍वास प्रस्तावावर मंगळवारी (ता. १) महासभा होणार आहे.

अविश्‍वास ठराव रद्द करण्यासाठी महासभेत ४५ सदस्यांची मंजुरी आवश्‍यक आहे. ( General Assembly will be held on motion of no confidence filed against Municipal Commissioner Dr Vidya Gaikwad jalgaon news)

सतरा मजली इमारतीच्या सतराव्या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकराला महासभा होईल. पीठासीन अध्यक्ष म्हणून महापौर जयश्री महाजन असतील. नगरसचिव सुनील गोराणे यांनी महासभेची सूचना जाहीर केली आहे.

त्यात म्हटले आहे, की जळगाव शहर महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावरील अविश्‍वास प्रस्तवाबाबत नगरसेवक अश्‍विन शांताराम सोनवणे व इतर सदस्यांनी २८ जुलैला दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, आयुक्तांवरील अविश्‍वास ठराव मागे घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. प्रस्ताव मागे घेण्यात येणार आहे.

मात्र, त्यासाठी महासभा घ्यावीच लागणार आहे. याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले, की महासभेत किमान ४५ सदस्यांचा कोरम आवश्‍यक आहे. अविश्‍वाचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी एकमताने किंवा बहुमताने प्रस्ताव मान्य करून ठराव मंजूर करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT