General Manager Ram Karan Yadav with the employees who received the General Manager's Safety Award. esakal
जळगाव

Jalgaon News : रेल्वे विभागातील 3 कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक’ संरक्षा पुरस्कार

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” प्रदान केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” प्रदान केला. ज्यामध्ये भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात कर्तव्यावर असताना त्यांनी घेतलेली दक्षता, अनुचित घटना रोखण्यात योगदान आणि नोव्हेंबर-२०२३ ते जानेवारी-२०२४ या कालावधीत रेल्वे संचलनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (General Manager Protection Award to 3 employees of Railway Department jalgaon news)

या पुरस्कारामध्ये एक पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्यासाठी प्रशस्तीपत्र, दोन हजार रुपये रोख पारितोषिक आहे.

भुसावळ मंडळ

ट्रॅक मेंटेनर- जितेंद्र कुमार (चांदूर बाजार, भुसावळ विभाग) यांनी तीन जानेवारी २०१४ सकाळी ड्यूटीवर होते, तेव्हा त्यांनी तेथून जात असलेल्या मालगाडीच्या १७ व्या वॅगनमध्ये हॉट एक्सल दिसला.

त्यांनी तत्काळ चांदूर बाजार स्थानकाला गाडी थांबवण्याची माहिती दिली आणि समस्या दूर झाली. त्याच्या सतर्कतेमुळे अपघात टळला.

ट्रॅक मेंटेनर सुनील शांताराम (वाघोडा) यांनी २४ जानेवारीस किमी ४८४/९-७ येथे रेल्वे फ्रॅक्चर पाहिले. त्यांनी तातडीने ट्रॅक सुरक्षित करून सर्व संबंधितांना माहिती दिली. त्याची तत्परता आणि निर्णय घेण्याच्या कौशल्यामुळे अपघात टळला.

डेप्युटी स्टेशन मॅनेजर आनंद पटले (शेगाव) यांनी दोन जानेवारीला रात्री पावणे अकराला जाणाऱ्या मालगाडीसोबत सिग्नलची देवाणघेवाण करत असताना त्यांना १६ व्या वॅगनमध्ये आग लागल्याचे दिसले. त्यांनी लगेच रेड सिग्नल दिला.

ट्रेन थांबवून लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजरच्या मदतीने तपास केला असता वॅगनच्या एक्सल बॉक्सला आग लागल्याचे आढळून आले. अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत केली.

अतिरिक्त महाव्यवस्थापक-चित्तरंजन स्वैन, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम. एस. उप्पल, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक एस. एस. गुप्ता, प्रधान मुख्य अभियंता राजेश अरोरा, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता सुनील कुमार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

Dharur Police : दिवाळीच्या गर्दीत हरवलेली पर्स पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाली; एकग्राम सोने व नगद केली परत

SCROLL FOR NEXT