girish mahajan challenges sanjay raut to Contest election from North East Mumbai jalgaon news esakal
जळगाव

Girish Mahajan News : संजय राऊत यांनी लढवावी ईशान्य मुंबईतून निवडणूक : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan News : माझा साधा शिवसैनिक उभा राहिला, तरी निवडणूक जिंकून येईल असे सांगण्याऱ्या खासदार संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवून जिंकून येवून दाखवावेच, असे आव्हान राज्याचे ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे. (girish mahajan challenges sanjay raut to Contest election from North East Mumbai jalgaon news)

जळगाव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर श्री. महाजन पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, खासदार संजय राऊत हे नेहमी अवाहन देत असतात. साधा शिवसैनिक उभा राहिला तरी निवडून येईल आणि पक्षाने सांगितल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे.

त्यामुळे त्यांनी आता ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावीच. गप्पा करणे, गोष्टी करणे हे सर्व सोपं असतं. परंतु माझे त्यांना आव्हान आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी खासदारकीला उभे रहावेच. ते कधी साधी महापालिकेची निवडणूकही लढलेले नाहीत.

मात्र, मोठ-मोठ्या गप्पा मारत असतात. त्यामुळे खासदारकीच्या निवडणूकीत आपल्याला किती मते पडतात, हे त्यांनी एकदा तपासून पहावे, असा टोलाही त्यांनी खासदार राऊत यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT