Girish Mahajan  esakal
जळगाव

काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा : गिरीश महाजन

कैलास शिंदे

जळगाव : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) आम्ही मतांचे योग्य नियोजन करून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पराभूत केले. विधान परिषदेच्या निवडणुकीतही (Legislative Council Election) आम्ही पाचवा उमेदवार निवडून आणणारच आहोत. त्यामुळे काँग्रेसने (Congress) आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा, असे थेट आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Grish Mahajan) यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले आहे. (Girish Mahajan Satement on legislative council elections Nashik News)

राज्यसभेत भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणण्याच्या प्रक्रियेत आमदार महाजनही होते. राज्यसभेतील यशानंतर ते आज जळगावी आले. आता राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. येत्या २० जूनला विधान परिषदेसाठी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी (ता. १३) शेवटची तारीख आहे. या निवडणुकीत भाजपच्या चार जागा निश्‍चित असल्या तरी त्यांनी दोन अतिरिक्त उमेदवार उभे केले आहेत. मात्र एकाची माघार घेऊन पाचव्या जागेसाठी पक्ष मैदानात उतरणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रसेचे दोन उमेदवारांचा विजय निश्‍चित असले तरी काँग्रेसचा दुसरा उमेदवारासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. भाजपला पाचव्या उमेदवारासाठी थेट २८ मतांची गरज आहे. तरीही भाजपने पाचव्या उमेदवारांच्या यशासाठी लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना आमदार महाजन म्हणाले, की विधान परिषदेत पाचवा उमेदवार विजय करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. आमच्या उमेदवाराला लागणाऱ्या मतांचा कोटा आम्ही मिळविण्याची तजवीज केली आहे. त्यामुळे आमचा उमेदवार निवडून येणारच, याची आपण आजच खात्री देत आहोत. आजच्या स्थितीत महाविकास आघाडीसोबत राहण्यास आमदार तयार नाहीत. महाविकास आघाडीचे नेते आमदारांना धाक दाखवीत आहेत, त्यांना धमक्या देत आहेत, त्याला आता आमदार कंटाळले आहेत. त्यामुळे हे आमदार आमच्या उमेदवाराला मतदान करतील, असा दावाही त्यांनी केला. विधान परिषदेत तर गुप्त मतदान पद्धती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचेही आमदार आमच्या उमेदवाराला मतदान करतील. त्यामुळे काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन आमचा पाचवा उमेदवार विजयी करून ही निवडणूक बिनविरोध करावी अन्यथा त्यांच्या उमेदवाराचा पराभव निश्‍चित आहे, हे आपण आजच खात्रीने सांगत आहोत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT