Girish mahajan Statement Bhosari plot case Eknath Khadse jalgaon Sakal
जळगाव

भोसरी भूखंड : खडसेंच्या अडचणी वाढणार, महाजनांचं सूचक विधान

भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात झोटींग समितीने केलेल्या चौकशी अहवालात माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या संदर्भात अनेक ताशेरे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात झोटींग समितीने केलेल्या चौकशी अहवालात माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या संदर्भात अनेक ताशेरे आहेत. व्यवहारात काय चुकीचे झाले, गैरव्यवहार झाला हे समोर आले असून तो अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवावा, अशी मागणीच आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. भाजपची बैठक आटोपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. महाजन बोलत होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंना कोणत्याही यंत्रणेने क्लीन चीट दिलेली नाही.

या प्रकरणात खरे दोषी तर खडसेच आहेत. मात्र, जमीन जावयांच्या नावाने खरेदी झाल्याने ते अडकले. वर्षभरापासून त्यांना जामीनही मिळू शकलेला नाही आणि खडसेंनाही दिलासा मिळालेला नाही, असेही महाजन म्हणाले.

.. तर राऊतांनी घाबरु नये

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाईच्या संदर्भात विचारले असता महाजन म्हणाले, राऊत यांनी चुकीचे काही केले नसेल तर त्यांनी या चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. परंतु, ज्या प्रकरणात चुकीचे आढळून येईल, त्यात ईडी आपले काम करेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT