Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : फसवणूक करून दिला मुलीच्या लग्नात फ्रीज!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : औद्योगिक वसाहतील रेमंड कंपनीसमोरील चहाविक्रेत्याने त्याच्या मित्राच्या नावे कर्जावर ३२ हजारांचा फ्रीज घेऊन तो मुलीच्या लग्नात दिला. फ्रीजचे पैसे मागितल्यावर संबंधिताला ठार मारण्याची धमकी दिली. (give refrigerator in girl marriage by fraud Jalgaon Crime News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

पाचोरा येथील अक्सानगरमधील रहिवासी अन्वर गुलाब पटेल खासगी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या ओळखीचा नाना सोनवणे याच्या मुलीचे लग्न असल्याने त्याने विनंती केल्यावरून अन्वर पटेल याने त्याच्या खात्यावर पाचोरा येथील प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड अप्लाईन्सेसमधून ३२ हजार रुपयांचा फ्रीज कर्जावर घेऊन दिला.

नाना सोनवणे याच्याकडे फ्रीजच्या पैशांची मागणी केली. त्याने अन्वर पटेल यास शिवीगाळ करून पैसे न देता ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने अन्वर पटेल यांनी अखेर जळगाव गाठत जिल्‍हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT