District Magistrate Dr. Vaishali Suryavanshi, Ramesh Bafna, Deepak Singh Rajput, Arun Patil, Sharad Patil, Bharat Khandelwal etc. while giving a statement to Vikram Bandal. esakal
जळगाव

Agriculture News : शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : पाचोरा व भडगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. शासनाच्या राखीव मदत निधीतून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे.पीकविमा कंपन्यांना त्वरित शेतकऱ्यांच्या भरपाईची रक्कम देण्याचे आदेश व्हावेत, या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना बुधवारी (ता. १९) देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा, की यंदाच्या खरीप हंगामाचे पावसामुळे प्रथमपासूनच नुकसान होत गेले. कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी ही पिके थोड्याफार प्रमाणात शिल्लक होती. त्यामुळे काहीतरी हातात पडेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते.(Give subsidy to farmers Shiv Sena Uddhav Thackeray group statement Jalgaon News)

परंतु गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानामुळे हाती येणारे उत्पादनही नष्ट झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना धीर व आधार देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा.

सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. शासनाच्या मदती निधीतून एकरी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना द्यावे व पीकविमा कंपनीकडून त्वरित भरपाई देण्याबाबतचे आदेश व्हावेत व शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट व अन्याय कमी करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर वैशाली सूर्यवंशी, रमेश बाफना, दीपकसिंग राजपूत, शरद पाटील, आनंद संघवी, अरुण पाटील, भरत खंडेलवाल, पप्पू जाधव, दादाभाऊ चौधरी, नाना वाघ, दत्ता जडे या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांचा सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT