Gold and Silver sakal
जळगाव

Gold and Silver : सोने ६२ हजार, तर चांदी ७७ हजारांवर...

जळगाव जिल्ह्यात आज सोन्याच्या दराने ६२ हजारांचा (प्रती तोळा जीएसटीसह) टप्पा गाठला. चांदीचे दरही ७७ हजार २५० रुपये प्रती किलोवर गेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव जिल्ह्यात आज सोन्याच्या दराने ६२ हजारांचा (प्रती तोळा जीएसटीसह) टप्पा गाठला. चांदीचे दरही ७७ हजार २५० रुपये प्रती किलोवर गेले आहेत.

जळगाव - जळगाव जिल्ह्यात आज सोन्याच्या दराने ६२ हजारांचा (प्रती तोळा जीएसटीसह) टप्पा गाठला. चांदीचे दरही ७७ हजार २५० रुपये प्रती किलोवर गेले आहेत. कोरोना काळानंतर सोने आणि चांदीच्या दरात प्रथमच एवढी भाववाढ झाली आहे.

सोन्याच्या दरातील वाढीमागे अमेरिकेसह इतर देशांमधील बँकिंग क्षेत्रावर आलेले संकट कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेसह युरोपातील बँकांची स्थिती बिकट झाली आहे. डॉलर कमकुवत झाला आहे. शेअर बाजारात अनिश्चितता आहे. त्याचा फायदा सोन्यासह चांदीत गुंतवणुकीला होत आहे. त्यामुळे सोने वधारले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सोन्याच्या दरांत चढ-उतार सुरू आहे.

मंगळवारी सोन्याचा प्रती तोळा दर ५९ हजार २०० रुपये होता. आज त्यात ५०० रुपयांची वाढ होऊन दर ६० हजार २०० वर (विना जीएसटी) गेला. जीएसटीसह सोने ६२ हजार सहा रुपये झाले आहे. चांदीचे दर प्रती किलो ७२ हजार रुपये होते. त्यात एकाच दिवसात तीन हजारांची वाढ होत ते ७५ हजारांवर गेले. जीएसटीसह चांदी ७७ हजार २५० रुपयांवर गेली.

अमेरिकेतील व्याजदरवाढ

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह आणि इतर देशांच्या केंद्रीय बँकांच्या व्याजदरात मोठी वाढ झाल्याने बँकिंग क्षेत्रात संकट आले आहे. मंदीच्या आशंकेने सोन्याचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे दर घसरले होते. आता त्यात सतत वाढ होत आहे. सोन्याची मागणी वाढणार असून भारतात सोन्याच्या किमती १० ग्रॅमसाठी ६५ हजारांवर जाण्याची शक्यता असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगत आहेत.

संकटाचा परिणाम

भारतीय लोक अद्यापही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होईल या भीतीपोटी पाश्चात्त्य देशात मागणी वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत मात्र मागणी कमी झाली आहे. भारतीय ग्राहक दर स्थिर होण्याची वाट पहात आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

दरांतील वाढ

तारीख सोने चांदी

२८ मार्च ५८ हजार ४०० ७० हजार

३० मार्च ५८ हजार ७० हजार ५००

४ एप्रिल ५९ हजार ३०० ७२ हजार

५ एप्रिल ६० हजार २०० ७५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT