Gold Silver Price Update news esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावातील सुवर्णबाजारात सोने 56 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : देशात विख्यात असलेल्या जळगावच्या सुवर्णबाजारात आज (ता.२२) सोन्याच्या दराने प्रतितोळा ५६ हजारांचा आकडा पार केला. अर्थात, हा दर जीएसटीसह असला तरी प्रत्यक्ष सोन्याचा भाव आज ५५ हजारावर गेला होता. चांदीही ‘भाव’ खात असून बाजारात चांदीचा दर गुरुवारी ७० हजारांच्या जवळपास पोचला.

गेल्या दोन महिन्यांपासून सोने- चांदीच्या दरात प्रचंड चढ- उतार सुरु आहे. महिनाभरापासून तर हे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक उलाढाली त्याला कारणीभूत असल्या तरी भारतात साधारणतः: लग्नसराईच्या हंगामात सोने- चांदीच्या दरात वाढ होते, असे मानले जाते. (Gold price in Jalgaon gold market at 56 thousand Rate hit high GST Silver is also in of 70 thousand Jalgaon News)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

५६ हजारांवर पोचले सोने

गुरुवारी सोन्याच्या भावाने जळगावात उच्चांक गाठला. २४ कॅरेट प्रतितोळा (१० ग्रॅमसाठी) सोन्याचा भाव जळगावात गुरुवारी ५४ हजार ८०० हजार होता, त्यात ३ टक्के जीएसटीची रक्कम समाविष्ट केली तर तो तर ५६ हजारांपर्यंत पोचतो. येणाऱ्या काळात सोन्याचा दर ६० हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

चांदीही ७० हजारांच्या घरात

प्रतिकिलो चांदीचा दर जळगावच्या बाजारात ६८ हजार ५०० होता. त्यात ३ टक्के जीएसटीची रक्कम समाविष्ट केली तर चांदी ७० हजारांच्या घरात आज विकली गेली.

"आंतरराष्ट्रीय बाजारात सोने- चांदीच्या दरात चढउतार होत असून त्याचा परिणाम जळगावच्या बाजारातही जाणवत आहे. येणाऱ्या काळात कोरोनाचा उद्रेक वाढल्यास सोन्याचे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे."

- मनोहर पाटील , जनसंपर्क अधिकारी, रतनलाल बाफना ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT