Gold silver rate hike esakal
जळगाव

Jalgaon News : सोन्याने गाठला 55 हजारांचा टप्पा; चांदीला 1500 ची झळाळी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जशी थंडी वाढतेय तसतसे सोन्या, चांदीच्या दरातही वाढ होतयं. शुक्रवारी (ता. ९) सोन्याच्या दराने ‘जीएसटी’सह ५५ हजार ४१४ रुपयांचा टप्पा (प्रतितोळा) पार केला, तर चांदीनेही प्रतिकिलो ६८ हजार ४९५ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ४ डिसेंबरला सोने ५३ हजार ८०० प्रतितोळा, तर चांदी ६५ हजार प्रतिकिलो (जीएसटी विना) होती.

४ डिसेंबरला सोन्याच्या दरात प्रतितोळा तीन हजारांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो साडेपाच हजारांची वाढ झाली होती. आगामी काळात सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे, तो आता पूर्णत्वाकडे येत आहे. (Gold Rates reaches 55 thousand rank Silver reaches 1500 rupees Jalgaon News)

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

गेल्या महिन्यात सुरू झालेल्या लग्नसराईमुळे सोन्याला मोठी मागणी होत आहे. सुवर्ण व्यवसायिकांच्या अनुभवानुसार सोने, चांदीच्या दरात हवी तशी भाववाढ होत नव्हती. आता चांगला दर सोने, चांदीला मिळाला आहे. तो आणखी वाढेल, अशी शक्यता आहे.

२५ नोव्हेबरला चांदीत तब्बल दीड हजारांची वाढ होऊन चांदी ६३ हजार ५०० पर्यंत पोचली होती. १ डिसेंबरपासूनही सोने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यादिवशी सोने ५३ हजारांवर, तर चांदी ६४ हजारांवर पोचली होती. शुक्रवारी सोने ५३ हजार ८०० प्रतितोळा (विनाजीएसटी), तर चांदी ६६ हजार ५०० वर पोचली आहे.

काही दिवसांतील दर असे (जीएसटीविना)

तारीख-- सोने प्रतितोळा -- चांदी प्रतिकिलो

१ डिसेंबर-- ५३ हजार-- ६४ हजार

४ डिसेंबर-- ५३ हजार ८००-- ६५ हजार

८ डिसेंबर-- ५३ हजार ६००-- ६५ हजार

९ डिसेंबर-- ५३ हजार ८००-- ६६ हजार ५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT