जळगाव : विद्यार्थ्यांना पंतप्रधानांना भेटण्याची सुवर्णसंधी  sakal
जळगाव

जळगाव : विद्यार्थ्यांना पंतप्रधानांना भेटण्याची सुवर्णसंधी

टपाल विभागाचा उपक्रम; अमृतमहोत्सवानिमित्त निवडक स्पर्धकांची दिल्लीला अभ्यास सहल

शंकर भामेरे

पहूर (ता. जामनेर) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय टपाल विभागातर्फे केवळ ५० पैशांत शालेय विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पंतप्रधानांना पत्र लेखन या विशेष उपक्रमांतर्गत पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित पत्र लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय टपाल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधानांना पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेसाठी ‘२०४७ मधील भारत’ आणि ''स्वातंत्र्य संग्रामातील योद्धे'' असे विषय देण्यात आले आहेत.

पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेत झालेल्या पत्रलेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उदघाटन पहूर टपाल विभागाचे पोस्ट मास्तर एस. पी. मेहरुणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांचा आणि टपाल कर्मचारी अमोल लोखंडे यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

प्रत्येक शाळेतील पत्र प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली येथे पाठविले जाणार असून, त्यातील निवडक ७५ विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटता येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांना संवाद साधण्याची संधीही पोस्ट विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ही अभ्यास सहल आयोजित करण्यात येणार असून, संपूर्ण खर्च भारत सरकारच्यावतीने केला जाणार आहे. सर्व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वितेसाठी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT