जळगाव

पालकमंत्र्याच्या मतदार संघातील रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वनवा   ​

दगडू पाटील

धरणगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरावीत, अशी मागणी होत आहे. पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असूनही शहरातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. धरणगावात ग्रामीण रुग्णालयाची इमारत आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानाची अतिशय वाईट अवस्था आहे. 

धरणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी अशी चार पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असते. रुग्णालयात दररोज साधारण १५० ते २०० रुग्ण ओपीडीला असतात आणि एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर कामाचादेखील भार येतो. ‘आयुष’अंतर्गत दोन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. त्यांपैकी, एक युनानी डॉक्टर कार्यरत आहेत, तर आयुर्वेदचे पद रिक्त आहे. नर्सिंग स्टाफसाठीसुद्धा नऊ पदे असून, चार पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी ज्युनिअर क्लार्कचे एक पद व शिपायाचे पद रिक्त आहे. शालेय तपासणीसाठी (आरबीएसके) चार पदे असून, त्यांपैकी दोन पदे रिक्त आहेत. अशा निवडक कर्मचारी वर्गावर रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. 

मरणानंतरही नरकयातना  

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन खोलीची अवस्था दयनीय आहे. शवविच्छेदन खोली अद्ययावत करावी, रिक्त असलेली विविध पदे तातडीने भरली जावीत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर नियुक्ती, कर्मचारी पूर्तता करण्याकडे लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

प्रस्ताव शासनाकडे

धरणगाव शहरासाठी उपजिल्हा रुग्णालय व्हावे, ५० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती आहे. प्रस्तावाचा पाठपुरावा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरासाठी उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात आणावे यामुळे अधिक अद्ययावत सुविधा रुग्णांना मिळतील, अशी अपेक्षा आहे. 

गेल्या दोन वर्षांत आपण तीन ते चार डॉक्टर धरणगावसाठी दिले होते. मात्र हे डॉक्टर टिकत नाहीत, सोडून जातात. आता पालकमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर बोलून रुग्णालयातील रिक्त जागांबाबत पाठपुरावा करावा. इतर कर्मचाऱ्यांबाबत नाशिक विभागीय कार्यालयाकडून वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत असते. जिल्हास्तरावरून आपण दिलेले डॉक्टर हजर होतात आणि काही दिवसांनी वेगवेगळ्या कारणांनी सोडून जातात. -डॉ. एन. एस. चव्हाण, 
जिल्हा शल्यचिकित्सक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20: भारताने विश्वविक्रमासह सामना जिंकला, अभिषेक शर्मा- वैभव सूर्यवंशीची तुफान फटकेबाजी; ट्वेंटी-२०त अशी मॅच नसेल पाहिली

बाबा वेंगांनी सांगितलं होतं? नोव्हेंबरमध्ये 'या' ५ राशींचं नशीब चमकणार? पैसा, नोकरी अन् प्रेमात मोठे बदल

शेतकऱ्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर! मुरबाडमधील कारवाईप्रकरणी नागरिकांचा संताप; तहसीलदारांकडे निवेदन

नदीतले ताजे मासे अन् गावाकडचा खास बेत! पाहा मासे बनवण्याची पारंपरिक पद्धत; Mandavi Special

IND vs NZ 3rd T20I : ९ चौकार, ११ षटकार.. अभिषेक शर्माच्या ३७ चेंडूंत ११३ धावा; क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना... टीम इंडियाचे वर्ल्ड रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT