Guardian Minister talk With Tribal Women esakal
जळगाव

Political News : आदिवासी महिलेच्या बाळाप्रति पालकमंत्र्यांची संवेदनशीलता

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी (ता. १६) जनता दरबार सुरू असताना आदिवासी महिला आपल्या कडेवर लहान बाळ घेऊन त्या गर्दीत दिसली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गर्दीतून त्या आदिवासी महिलेची समस्या काय आहे, याविषयी विचारणा केली.

जन्मजात बाळाला दृष्टिदोषाची समस्या असल्याचे सांगताच मंत्री पाटील यांनी उपचारासाठी तत्काळ दहा हजारांची मदत करीत एक हात मदतीचा देत बाळाच्या पुढील उपचाराची जबाबदारी स्वीकारली.(Government Rest House Janata Darbar Guardian Ministers sensitivity towards tribal woman baby Jalgaon Political News)

पालकमंत्री पाटील यांचा पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात नेहमीच जनता दरबार भरतो. या दरबारात आपल्या गावातील समस्या मांडतात. रविवारीदेखील नागरिकांचा जनता दरबार भरल्याने त्या गर्दीत धरणगाव तालुक्यातील फुलपाट येथील भिल्ल-नाईक समाजातील आदिवासी महिलाही कैफियत घेऊन आली होती.

एकीकडे कार्यकर्त्यांसह नागरिकही विविध समस्या घेऊन पालकमंत्री पाटील यांची भेट घेण्यासाठी जमले होते. त्या गर्दीत या आदिवासी महिलेचाही सहभाग दिसून आला. एवढ्या मोठ्या गर्दीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना इशारा करीत त्या महिलेला बोलावून घेत काय समस्या आहे, असे विचारले.

त्यावर या महिलेने ‘माझ्या बाळाला जन्मजात डोळ्यांची समस्या आहे. त्याला व्यवस्थित दिसत नाही. त्याला दृष्टिदोष व हृदयाची समस्या आहे,’ असे सांगितले. पालकमंत्र्यांनी त्या महिलेचे म्हणणे ऐकून घेत तत्काळ दहा हजारांची मदत केली व पुढील उपचाराची जबाबदारी उचलली. त्या महिलेने भावुक होऊन पालकमंत्र्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT