MLA kishor patil esakal
जळगाव

पाचोरा, भडगाव तालुक्यात होणार 54 बंधारे; 28 कोटींचा निधी मंजूर

मिलींद वानखेडे

पाचोरा (जि. जळगाव) : पाचोरा विधानसभा मतदारसंघात (Assembly constituency) समाविष्ट असलेल्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध गावांत ५४ सिमेंट बंधाऱ्यांसह (Dams) २८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून, यामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होऊन पाचोरा व भडगाव तालुका सुजलाम् सुफलाम् होणार असल्याचा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला. (Govt approves rs 28 crore to built 54 dams in Pachora Bhadgaon taluka Jalgaon News)

आमदार पाटील यांनी शिवालय आपल्या संपर्क कार्यालयात नुकतीच पत्रकार परिषद घेतली व त्यात मंजूर झालेल्या विविध विकास कामांसंदर्भात माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले, की पाचोरा व भडगाव तालुक्यात सुमारे २८ कोटी रुपयांच्या ५४ ठिकाणच्या सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून, यामुळे दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे. शासनाचा निधी मंजूर झाला असून, लवकरच या कामांना सुरवात होणार आहे.

यात कासमपुरा, टाकळी, भोरटेक खुर्द, बांबरुड महादेवाचे, सारोळा, निंभोरी, नालबंदी, बाळद बुद्रुक, पिंपळगाव हरेश्‍वर, म्हसास, सावखेडा खुर्द, वरसाडे, पिंपळगाव तांडा, वाडी बांबरुड खुर्द, लोहारी खुर्द, खडकदेवळा, शेवाळे, वाडी, नाचणखेडा, आसनखेडा, तारखेडा, लासगाव, बांबरुड राणीचे, शेवाळे, गाळण खुर्द, आसनखेडा, कोळगाव, पथराड, वडजी, खाजोळा, वाघुलखेडा, सारोळा या गावांचा समावेश असून, आणखीही काही गावांत सिमेंट बंधारे करण्यासंदर्भात नियोजन आहे. परंतु काही ठिकाणी जागेची अडचण असल्याने जागेचा प्रश्न सोडवून नियोजनबद्धरीत्या सिमेंट बंधारे तयार करून शंभर टक्के हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते. राजेश पाटील यांनी आभार मानले.

"मतदारसंघातील शेती, सिंचन, दळणवळण, व्यापार, उद्योग हे आपले प्राधान्याचे विषय असून, त्यादृष्टीने मार्गक्रमण सुरू असून, शेवटच्या घटकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत."

- किशोर पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT